Kedarnath Dham Yatra 2023: केदारनाथ यात्रेसाठी नोंदणी पुन्हा सुरू होणार, 'या' दिवसापासून करु शकता अर्ज

उत्तराखंडमधील खराब हवामानाच्या पार्श्वभूमीवर केदारनाथ धाम यात्रेची नोंदणी थांबवण्यात आली होती,पण आता लवकरच नोंदणी सुरू होणार आहे.
Kedarnath Dham Yatra 2023
Kedarnath Dham Yatra 2023Dainik Gomantak

Kedarnath Dham Yatra 2023: केदारनाथ धाम यात्रेसाठी भाविकांची मोठी गर्दी आहे. केदारनाथ यात्रेसाठी ऑनलाइन नोंदणी केली जात आहे. 

उत्तराखंडमधील खराब हवामानामुळे अनेकवेळा नोंदणी वेळोवेळी थांबविण्यात आली होती. आता केदारनाथ यात्रेच्या दर्शनासाठी 10 जूनपासून नोंदणी सुरू होत आहे. खराब हवामान आणि भाविकांची वाढती गर्दी यामुळे नोंदणी वर बंदी घालण्यात आली होती.

  • भाविकांची संख्या 41 लाखांच्या पुढे

चारधाम यात्रा 2023 मध्ये दर्शनासाठी आलेल्या भाविकांची संख्या 41 लाखांच्या पुढे गेली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केवळ केदारनाथ धामसाठी दररोज 20 हजारांहून अधिक नोंदणी केली जात आहे. केदारनाथ धामसाठी आतापर्यंत एकूण 13 लाख 38 हजार भाविकांनी नोंदणी केली आहे.

Kedarnath Dham Yatra 2023
Odisha Accident: पतीच्या मृत्यूचा बनाव महागात; पत्नीविरुद्ध पतीने दाखल केला गुन्हा
  • केदारनाथ यात्रेसाठी नोंदणी कशी करावी

केदारनाथ यात्रेसाठी ऑनलाइन नोंदणी करता येते. 

registrationandtouristcare.uk.gov.in या वेबसाइटवर जावून नागरिक सहजपणे नोंदणी करू शकतात. 

तुम्ही या टोल फ्री क्रमांक ०१३५१३६४ आणि १३६४ वर कॉल करूनही नोंदणी करू शकता.

  • केदारनाथ यात्रेचे महत्त्व

प्रत्येकाची इच्छा असते की एकदा तरी केदारनाथला जावे. केदारनाथ धाम यात्रा भक्तांच्या सर्व पापांचा नाश करते. चारधामच्या प्रवासात केदारनाथ धामचे दर्शन घेतल्यावरच प्रवास सफल होतो. केदारनाथ मंदिर सुमारे 400 वर्षे बर्फात गाडले होते, अशी वैज्ञानिक मान्यता आहे. बर्फात गाडूनही मंदिराला काही झाले नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com