Girls Run Away From Kasturba Gandhi Balika Vidyalaya Hostel Dainik Gomantak
देश

स्कूल हॉस्टेलमधून 55 मुली अचानक 'गायब', विद्यार्थिनींनी केला 'हा' आरोप

बिहारमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शाळेच्या वसतिगृहातून 55 मुली अचानक 'गायब' झाल्या.

Manish Jadhav

Girls Run Away From Kasturba Gandhi Balika Vidyalaya Hostel: बिहारमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शाळेच्या वसतिगृहातून 55 मुली अचानक 'गायब' झाल्या. मात्र, यातील काही मुली सोमवारी सकाळपर्यंत वसतिगृहात परतल्या. दरम्यान या प्रकरणाची माहिती मिळताच जमुई प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जमुई जिल्ह्यातील सोनो ब्लॉकमधील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातून (KGBV) शनिवारी मध्यरात्री 55 मुली पळून गेल्या. यातील सुमारे 20 मुली सोमवारी सकाळपर्यंत परतल्या. दरम्यान त्यांची विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की, त्यांना रात्रीचे जेवण दिले गेले नाही, त्यामुळे त्या वसतिगृह सोडून घरी गेल्या.

दरम्यान, या प्रकरणाची माहिती मिळताच जमुईचे जिल्हा शिक्षण अधिकारी कपिल देव तिवारी यांनी सर्व शिक्षा अभियानाच्या अधिकारी सीमा कुमारी यांना चौकशी करण्यास सांगितले. बेपत्ता झालेल्या बहुतांश मुली (Girl) या नववी ते बारावीतल्या असल्याचं सांगण्यात येत आहे.

काय म्हणाले सर्व शिक्षा अभियानाचे अधिकारी?

सीमा कुमारी यांनी पुष्टी केली की, शनिवारी रात्री जेवण उपलब्ध नसल्याने मुली पळून गेल्या. सुरक्षेतील त्रुटी असल्याचे सांगत त्या पुढे म्हणाल्या की, सोमवारी सकाळपर्यंत सुमारे 20 मुली परत आल्या.

दुसरीकडे, शाळेचे (School) मुख्याध्यापक प्रशांत कुमार यांनी सांगितले की, आम्ही सर्व मुलींना वसतिगृहात परत आणण्याचा प्रयत्न करत आहोत.

वसतिगृहातील वॉर्डन गुड्डी कुमार यांनी सांगितले की, शनिवारी रात्री जेवण न मिळाल्याने विद्यार्थिनी संतप्त झाल्या होत्या. आम्ही पहाटे 2 वाजेपर्यंत त्यांचा राग शांत करण्याचा प्रयत्न केला आणि नंतर झोपलो.

रात्री 2 वाजल्यानंतर मुली गेट उघडून वसतिगृहाच्या बाहेर गेल्या असतील. असे त्यांनी सांगितले. गार्ड अविनाश कुमार यांनी सांगितले की, जेव्हा मुली बाहेर आल्या तेव्हा त्यांना झोप लागली होती.

वसतिगृहात परतलेल्या मुली काय म्हणाल्या?

सोमवारी परतलेल्या 20 मुलींमध्ये सोनाली कुमारीचाही समावेश होता. सोनालीने सांगितले की, वसतिगृहात रात्री जेवण उपलब्ध नसण्याची ही पहिलीच वेळ नाही. दुसरी विद्यार्थिनी खुशबू कुमारी म्हणाली की, आम्हाला भूक लागली होती, म्हणून आम्ही वसतिगृहातून (Hostel) बाहेर पडलो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI: स्वातंत्र्य दिनी किंग कोहलीचा धमाका! वेस्ट इंडिजविरुद्ध ठोकलं दमदार शतक; टीम इंडियासाठी '15 ऑगस्ट' लय खास

मंत्री सुदीन ढवळीकर म्हणतात, 'गोव्यात मराठी राजभाषा होणे कठीण'

Weekly Horoscope: ऑगस्टचा हा आठवडा ठरणार 'लकी', 'या' 4 राशींवर होणार धनवर्षाव; आर्थिक स्थितीत होणार मोठा बदल

PM Viksit Bharat Rojgar Yojana: काय आहे ‘विकसित भारत रोजगार योजना’? तरुणांना कसे मिळणार 15,000 रुपये? PM मोदींची घोषणा

Viral Video: ‘हॅप्पी अंडस पंडस...’! स्वातंत्र्य दिनाची तयारी करणाऱ्या चिमुकल्याचा मजेदार व्हिडिओ व्हायरल, तुम्हीही हसून-हसून व्हाल लोटपोट

SCROLL FOR NEXT