Bihar Governor Statement: ‘राष्ट्रभक्तीची भावना कमी असते, म्हणूनच राष्ट्रगीत किंवा वंदेमातरम् सुरू असताना बसायचे की उभे राहायचे असा प्रश्न पडतो. राष्ट्रभक्तीची भावना कमी असल्यानेच छत्रपती शिवाजी महाराजांना देव म्हणायचे की काय म्हणायचे असा प्रश्न पडतो, तो प्रश्न का पडावा. ज्यांनी-ज्यांनी धर्माचे आणि संस्कृतीचे संरक्षण केले आहे,
ते सर्व आमच्यासाठी देवतास्वरूप आहेत. त्यांच्याबाबत मनात वेगळा भाव असूनच शकत नाही, असे मत बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी व्यक्त केले.
चैतन्य प्रतिष्ठान गोवातर्फे कांपाल येथील पणजी जिमखान्याच्या कार्यालयात झालेल्या ‘एक राखी सैनिकांसाठी’ या कार्यक्रमात आर्लेकर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. व्यासपीठावर राष्ट्रीय स्वयंसाह्य संघाचे दत्ताजी, मुख्यमंत्री प्रमोद सावंत, आरोग्य मंत्री विश्वजीत राणे, पर्यटन मंत्री रोहन खंवटे, खासदार सदानंद शेट तानावडे, ब्रिगेडीयर अजितसिंग साहनी, कमांडर अभिषेक श्रीवास्तव, पणजी जिमखान्याचे अध्यक्ष मनोज काकुलो उपस्थित होते.
आर्लेकर म्हणाले, आपण गावात राहतो, शहरात राहतो, पण आपले संरक्षण करतात ते सीमेवरील जवान. देशभक्तीची आठवण असावी आणि जवानांचे स्मरण व्हावे, यासाठी हा कार्यक्रम केले जाते. यापूर्वी आम्ही राख्या पाठवत होतो, पण मागील दोन वर्षे आपण स्वतः येथील राख्या घेऊन स्वतः जवानांना राख्या बांधल्या. आपल्या मनात राष्ट्रभक्तीची प्रेरणा जागी व्हावी, अशी भावना असते, पण ती निद्रिस्त असते, ती जागृत करण्यासाठीच हा कार्यक्रम आहे.
23 हजार राख्या
आर्लेकर म्हणाले, आत्तापर्यंत आपल्याकडे 23 हजार राख्या आलेल्या आहेत. घराघरांतून एक राखी आली आहे, मनात देशभक्ती आहे, ती अशा घटनांतून जागृत होते. चैतन्य प्रतिष्ठान काम करीत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.