Viral Video Dainik Gomantak
देश

Viral Video: पापा की परियां! कारच्या बोनेटवर मुलींचा स्वॅग; पोलिसांनी ठोठावला 18 हजारांचा दंड

Viral Video: चालत्या वाहनांवर स्टंट करत रिल्स बनवण्याची क्रेझ काही केल्या कमी होत नाहीये. पोलिसांच्या कारवाईनेही लोकांना काही फरक पडत नाहीये.

Manish Jadhav

Viral Video: चालत्या वाहनांवर स्टंट करत रिल्स बनवण्याची क्रेझ काही केल्या कमी होत नाहीये. पोलिसांच्या कारवाईनेही लोकांना काही फरक पडत नाहीये. ताजं प्रकरण अयोध्येचं आहे.

जिथे दोन मुली चालत्या गाडीवर स्टंट करत व्हिडिओ बनवत होत्या. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वाहतूक पोलिसांनी (Police) कार मालकाला 18 हजार रुपयांचा दंड ठोठावला. आता कायद्यानुसार, जी कारवाई करता येईल ती पोलिस पुढे करणार आहेत.

कारच्या बोनेटवर मुलींचा स्वॅग दिसला

व्हिडिओमध्ये एक पांढऱ्या रंगाची कार रस्त्यावर धावताना दिसत आहे. गाडीच्या बोनेटवर एक मुलगी बसलेली आहे. तर दुसरी कारच्या खिडकीतून बाहेर डोकावताना दिसत आहे.

खिडकीतून डोकावणारी मुलगी गाडीही चालवत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत 18 हजार रुपयांचा दंड ठोठावला. दीनदयाल मिश्रा असे कार मालकाचे नाव आहे.

व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्स संतापले

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ शैलेंद्र तिवारी नावाच्या युजरने ट्विटरवर शेअर केला आहे. ट्विटवर लोकांच्या संमिश्र प्रतिक्रीया येत आहेत.

मजेशीर पद्धतीने कमेंट करताना एका यूजरने लिहिले - बहिण पकडली गेली. त्याचवेळी, अनेकांनी अशा लोकांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT