Bihar girlfrien want to celebrate in Goa after killed her boyfriend  Dainik Gomantak
देश

बॉयफ्रेंडचा खून करून गोव्यात सेलिब्रेशन करणार होती गर्लफ्रेंड; नवीन मित्राला करायला लावला गोळीबार

थोडक्यात बचावला प्रियकर; खून लाईव्ह होताना पाहायचा होता...

Akshay Nirmale

Bihar Crime: बॉयफ्रेंडचा खून करून गोव्यात सेलिब्रेशन करण्याचा प्लॅन एका प्रेमिकेने आखला होता. त्यासाठी तिने तिच्या नवीन झालेल्या मित्राला फूस लावली. त्याला स्वतःच्या जुन्या बॉयफ्रेंडवर गोळीबारही करायला लावला.

पण सुदैवाने या हल्ल्यात या तिचा जूना बॉयफ्रेंड बचावला आहे. तथापि, गोळी त्याच्या बरगडीत घुसल्याने तो रूग्णालयात उपचार घेत आहे. दरम्यान, त्या प्रेयसीला प्रियकराचा खून होताना प्रत्यक्ष बघायचा होता, असेही पोलिसांनी केलेल्या चौकशीतून समोर आले आहे.

बिहारची राजधानी पाटणाच्या शास्त्रीनगर भागातील राजाबाजार येथे ही घटना घडली आहे. सद्दाम हुसैन उर्फ निशु खान असे त्या बॉयफ्रेंडचे नाव आहे. तो जागृती सिंग हिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होता. तथापि, त्यांच्यात बिनसले होते.

त्यानंतर जागृतीने त्याचा बदला घेण्यासाठी मिसाल सिंग या नव्या मित्राला फूस लावली. पोलिसांच्या चौकशीत तिची ही गुपिते उलगडली गेली आहेत.

शास्त्रीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धर्मेंद्र कुमार यांनी ही माहिती दिली. निशु खानच्या हत्येनंतर जागृती सिंग तिचा नवीन प्रियकर मिसाल सिंगसोबत गोव्यात मौजमजेसाठी जाणार होती. गोळीबारात सहभागी असलेल्या मिसाल सिंग याचा शोध पोलिस घेत आहेत.

मिसाल सिंग आणि जागृती सिंग यांच्यात प्रेमसंबंध होते. मिसालने जागृतीकडे गोव्याला जाऊया, असा लकडा लावला होता. पण जागृतीने त्याला सांगितले होते की, निशु खान याला मारल्यानंतर सेलिब्रेशन करण्यासाठी ती गोव्याला जाईल. तसेच निशुचा खून होताना तिला प्रत्यक्ष बघायचे होते.

मिसाल सिंगच्या फ्लॅटवर नेहमी पार्ट्या होत असतात आणि तिथे मद्य आणि मुलीही असतात. गुरूवारी जागृती ही मिसालच्या घरी पार्टीत होती. तेव्हा ती फोनवरून निशु खानच्या हालचालींची मिनिटामिनिटाला माहिती घेत होती.

निशु त्याचा मित्र जैदला सोडायला घरी गेला आहे, हे समजताच जागृती मिसालसोबत कारमधून निशुचा पाठलाग करू लागली. चार किलोमीट पाठलाग करूनही त्यांना गोळी मारण्यासाठी योग्य जागा आणि संधी मिळाली नाही. अखेर समनपूरा वळणावर त्यांनी निशुची गाडी थांबवली.

जागृती आणि तिची मैत्रिण मिसालच्या गाडीतून खाली उतरल्या. त्यानंतर जागृतीने इशारा करताच मिसाल सिंगने निशु खानवर गोळीबार केला. दोन गोळ्या इतरत्र लागल्या. पण तिसरी गोळी थेट निशु खानच्या बरगडीत घुसली.

दरम्यान, या प्रकारानंतर काही जणांनी निशु खानला तत्काळ दवाखान्यात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी गोळी बाहेर काढून निशुचा जीव वाचवला. तो सध्या दवाखान्यात आहे.

पोलिसांनी मिसाल सिंगच्या गाडीचा नंबर ट्रेस करून सीसीटीव्हीच्या आधारे त्याचा शोध घ्यायला सुरवात केली आहे. मिसालकडे बंदुकीचा परवाना असल्याची माहिती, जागृतीने पोलिसांना दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: मंगळ करणार 'त्रिगुणी संचार'!! सुरु होणार धन, सुख आणि समृद्धीचा प्रवाह; 3 राशींना मिळणार फायदा

Canacona: रायींमध्ये देवत्व लाभलेला, दूधसागरकडे जाताना लक्ष वेधून घेणारा 'मधुवृक्ष जर्माल'

Cluster University Goa: एकेकाळी 'गोवा युनिव्हर्सिटी'ला केंद्रीय दर्जा देण्याची चर्चा चालली होती; क्लस्टर विद्यापीठांची संकल्पना

Goa Live News: भाजप गोवा राज्य संघटनात्मक कार्यशाळेला म्हापसा येथे सुरुवात

Narve: नार्वेच्या पंचगंगेच्या तीरावर भरली ‘अष्टमीची’ जत्रा; भरपावसातही भक्तीचा उत्साह

SCROLL FOR NEXT