Indian Students Dainik Gomantak
देश

...घर लौट ही नहीं पाऊंगी", युक्रेनहून परतलेल्या संस्कृतीने सांगितला थरारक प्रसंग

युद्धग्रस्त युक्रेनमधून (Ukraine) भारतात परतलेल्या उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगरमधील एका विद्यार्थिनीने आपला संघर्षमय प्रसंग सांगितला.

दैनिक गोमन्तक

युद्धग्रस्त युक्रेनमधून (Ukraine) भारतात परतलेल्या उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगरमधील एका विद्यार्थिनीने आपला संघर्षमय प्रसंग सांगितला. तीने यावेळी सांगितले की, 'एका क्षणी मला असे वाटले की, मी कधीही मायदेशी परत येऊ शकणार नाही.' ग्रेटर नोएडामध्ये राहणारी संस्कृती सिंग बुधवारी रोमानियाची (Romania) राजधानी असणाऱ्या बुखारेस्टमधून भारतात पोहोचली. ती युक्रेनमधील इव्होना शहरातील एका विद्यापीठाच्या वसतिगृहात राहत होती. (Girl Who Returned From Ukraine Said Thrilling Story)

संस्कृती म्हणाली, 'इनोव्हामध्ये रशियन हल्ल्याचा फारसा परिणाम झाला नाही, परंतु हल्ल्यानंतर विमानतळ बंद करण्यात आले. कॉलेजकडून हॉस्टेलच्या भोजनगृहात जेवण बंद करण्यात आले होते. दुकाने आणि एटीएमवर लांबच लांब रांगा लागल्या होत्या.'

संस्कृती पुढे म्हणाली, “ही परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांनी वेगवेगळे गट तयार केले आणि प्रत्येक गटाला वेगवेगळ्या कामाची जबाबदारी सोपवण्यात आली. काहींना जेवण बनवण्याची तर काहींना बाजारातून जीवनावश्यक वस्तू आणण्याची जबाबदारी देण्यात आली. या हल्ल्यादरम्यान पाणी महाग झाले. साधारणपणे पाच लिटरची पाण्याची बाटली 40 ते 45 रुपयांना मिळत होती, मात्र ती आता 100 रुपयांपर्यंत गेली होती.''

संस्कृतीने असेही म्हटले की, "तेव्हा मला घरी परत जाता येणार नाही असे वाटू लागले." दुसऱ्या दिवशी सकाळी सीमा ओलांडल्यानंतर माझ्या जीवात जीव आल्याचे देखील तिने सांगितले. तेथील तापमान सहा अंश सेल्सिअस खाली होते, त्यामुळे तेथील लोक भारतीय विद्यार्थ्यांसाठी जेवणाची व्यवस्था करत होते.

शिवाय, त्यावेळी भारतीय विद्यार्थ्यांसाठी सीमा बंद करण्यात आली होती. परंतु त्यानंतर दुसऱ्या दिवशी सीमा उघडली जाईल असे सांगण्यात आले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT