Crime News Dainik Gomantak
देश

धर्मीची ओळख न दाखवता रिलेशनशीपच्या नावाखाली मुलीवर केला 2 वर्ष बलात्कार

एका तरुणीवर बलात्कार करून, तिचा अनेकवेळा गर्भपात आणि नंतर तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला अटक

दैनिक गोमन्तक

उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात एका तरुणीवर बलात्कार करून, तिचा अनेकवेळा गर्भपात आणि नंतर तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. तिच्यावर अत्याचाक करणाऱ्या कॉन्स्टेबलला गुरुवारी अटक करण्यात आली . पोलिस अधीक्षक आकाश तोमर यांनी सांगितले की, कोतवाली नगर भागात राहणाऱ्या एका तरुणीवर आपले नाव आणि धर्म लपवून बलात्कार करणाऱ्या आणि अनेक वेळा गर्भपात केल्यानंतर तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी इन्स्पेक्टर वासी अहमदला अटक करण्यात आली आहे.(Gonda Love Jihad Case)

तोमर यांनी सांगितले की, 'एका तरुणीने दोन दिवसांपूर्वी पोलिस लाईनमध्ये तैनात इन्स्पेक्टर वासी अहमद यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. पोलीस स्टेशन कोतवालीमध्ये पोस्टिंग दरम्यान इन्स्पेक्टर वासी अहमदने आपले नाव रिंकू शुक्ला सांगून मुलीशी मैत्री केली. त्यानंतर लग्नाच्या बहाण्याने तिच्यावर दोन वर्षे बलात्कार केला. अहमदने अनेक वेळा तिचा गर्भपात केल्याचा आरोपही मुलीने केला आहे. मुलीने त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकल्यानंतर 27 जूनच्या रात्री त्याने तिला आईस्क्रीममध्ये विषारी पदार्थ पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. आईस्क्रीम खाल्ल्यानंतर मुलीचा प्रकृती बिघडली, त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात दाखल केले. आणि त्यानंतर या प्रकरणाचा खुलासा झाला.'

तक्रार करण्यासाठी मुलगी जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली तेव्हा तिला इन्स्पेक्टरची हकीकत कळली. सत्य जाणून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. पीडितेने फिर्याद देऊन आरोपी निरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तोमर यांनी सांगितले की, दोन दिवसांपूर्वी नगर कोतवालीमध्ये इन्स्पेक्टर वासी अहमदविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना निलंबित करून विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

इन्स्पेक्टर आपल्या बहिणींच्या लग्नाच्या बहाण्याने लग्न पुढे ढकलत होता आणि मुलीने त्याच्यावर दबाव टाकताच त्याने मोबाईल बंद करून पळ काढला. पीडितेने सांगितले की, जेव्हा ती पहिल्यांदा भेटली तेव्हा त्याने आपले नाव रिंकू शुक्ला असल्याचे सांगितले होते. तिला हे नंतर कळले पण ती रिलेशनशिपमध्ये असल्याने हा मुद्दा तिने स्वत:हून उपस्थित केला नाही. मात्र आता पोलीस स्टेशनला येवून तिने गुन्हा नोंदविला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opinion: आधी 'मौजमजा करण्यासाठी गोव्यात या' म्हणणारे, आता ‘गोवाच विकत घ्या’ म्हणताहेत..

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशी दिवशी 5 ग्रहांचा महायोग, 'या' राशींना मिळणार बंपर लाभ

Paliem: कुळवाड्यांनी शेकडो वर्षांपूर्वी भूमातेची पूजा आरंभली! निसर्गसंपन्न 'पालये' गाव; भोम येथील महाकाय वटवृक्ष

Opinion: प्लेटो दाखवून देतो, ‘लोकशाही’ शहाणपणापेक्षा ‘लोकप्रिय’ मताला प्राधान्य देऊन, हुकूमशाहीचा मार्ग सुकर करते

Ashadhi Ekadashi: ..जातां पंढरीसी सुख वाटे जीवा। गोव्यातील लाखो वारकऱ्यांनी गाठले पंढरपूर

SCROLL FOR NEXT