गाझियाबाद : ‘हॅलो..पोलीस अंकल, पाच लोगोका मर्डर हो गया है’ असा फोन गाझीयाबादच्या (Gaziabad) पोलीसांना आला आणि पोलिसांचे (Police) धाबे दणाणले. या माहितीची गांभीर्याने दखल घेत पोलीसांनी तपास सुरु केला आणि त्यांना समजले की, एका लहान मुलीने आपला पोपट केला. (Ghaziabad student prank police)
दुपारी अडीचच्या सुमारास इयत्ता तीसरीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने तिच्या वडिलांचा मोबाइल मोबाईल वापरुन पोलिसांना फोन केला आणि सांगितले की, “पोलिस अंकल, सरकारी शाळेजवळच्या, गल्ली नंबर 5 मध्ये पाच लोकांचा खून झाला आहे. आपण लवकर या, मी एकटीच आहे."
या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांची एक टीम तात्काळ घटनास्थळी पोहोचली. मात्र तपासासाठी गेलेल्या या पोलिसांच्या पथकाला फोनवर सांगितल्या प्रमाणे काहीही सापडले नाही. आणि ज्या फोनवरुन पोलीसांना फोन येत होता, तो फोन सुद्धा बंद येत होता.
सुमारे 30 मिनिटांनंतर तो फोन चालू झाला. त्यानंतर पोलिसांनी पुन्हा हा नंबर डायल केला आणि त्या कॉलचे उत्तर मुलीच्या वडिलांनी दिले, जे एका खासगी कंपनीतील कर्मचारी आहेत. त्यानंतर, त्या मुलीने पोलिसांना खोटी माहीती दिल्याचे उघड झाले. तिच्या पालकांनी सांगितले की तिने यापूर्वीही असे कॉल केले होते. एकदा, तिने तिच्या काकांना बोलावले होते आणि सांगितले की तिच्या वडीलांचा अपघात झाला, तेव्हाही त्यांचे नातेवाईक आणि शेजारी त्यांच्या घरी पोहोचले होते.
पोलिस चौकशीत असे समोर आले आहे की, या मुलीला टेलिव्हिजन चॅनलवरील गुन्हेगारी आणि त्यासंबंधीचे कार्यक्रम पाहायला आवडते. त्यातुन तिला हे लक्षात आले काही अडचण आल्यास '112' हेल्पलाईनशी संपर्क साधावा लागला. "पोलिस वेळेवर येतात की नाही, हेही तिला तपासण्याची इच्छा होती. आम्ही मुलीच्या पालकांना इशारा दिला आहे आणि भविष्यात तिने असे करु नये याची काळजी घ्यावी," असे एका पोलिस अधिकाऱ्याने माध्यमांना सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.