Accused Dainik Gomantak
देश

Ghaziabad: निष्पाप मुलीची हत्या करणाऱ्या हैवानाला कोर्टाने सुनावली फाशीची शिक्षा

Ghaziabad Crime: गाझियाबादच्या पोक्सो न्यायालयाने एका निष्पाप मुलीची गळा दाबून हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या तरुणाला फाशीची शिक्षा सुनावली आहे.

Manish Jadhav

Ghaziabad Crime: गाझियाबादच्या पोक्सो न्यायालयाने एका निष्पाप मुलीची गळा दाबून हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या तरुणाला फाशीची शिक्षा सुनावली आहे. घटनेच्या अवघ्या 65 दिवसांनंतर न्यायालयाने या लज्जास्पद आणि घृणास्पद प्रकरणात शिक्षा सुनावली. 1 डिसेंबर 2022 रोजी साहिबााबाद पोलिस स्टेशन परिसरात साडेचार वर्षांच्या मुलीचे अपहरण करुन बलात्कारानंतर तिची हत्या करण्यात आली होती.

दरम्यान, गाझियाबादच्या विशेष पॉक्सो न्यायालयाने शनिवारी आरोपी सोनू गुप्ता याला साडेचार वर्षांच्या मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली. यासोबतच आरोपीला 20 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

आरोपी सोनू गुप्ता हा नंदग्राममध्ये राहतो. एका निष्पाप मुलीवर बलात्कार करुन खून केल्याप्रकरणी न्यायालयाने (Court) सबळ पुराव्यांच्या आधारे आरोपी सोनूला या जघन्य गुन्ह्यात दोषी ठरवले.

तसेच, शनिवारी दुपारी न्यायालयात दोषी सोनू गुप्ताबाबत सुनावणी सुरु झाली. यादरम्यान, विशेष सरकारी वकिलाने फाशीच्या शिक्षेची मागणी केली, तर बचाव पक्षाने हा पहिलाच गुन्हा असल्याचे कारण देत कमी शिक्षेची मागणी केली होती.

बलात्कारानंतर तिची हत्या करण्यात आली

शुक्रवारी न्यायालयाने सोनू गुप्ताला मुलीच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवले. साहिबााबाद परिसरातील सिटी फॉरेस्टमध्ये एका साडेचार वर्षाच्या मुलीवर बलात्कार करुन हत्या केल्याप्रकरणी आरोपीला दोषी ठरवण्यात आले. ही घटना 1 डिसेंबर 2022 रोजी साहिबााबाद पोलिस स्टेशन परिसरात घडली.

दुसरीकडे, सिटी फॉरेस्टमध्ये एका मुलीचा मृतदेह पोलिसांना मिळाला होता. तिचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी सांगण्यात आले होते. त्यानंतर, पोलीस (Police) या हत्येच्या तपासात गुंतले आणि आठ दिवसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींपर्यंत पोहोचले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT