Political Crisis in Rajasthan Congress. Dainik Gomantak.
देश

Rajasthan Politics: राहुल यांच्या भावनिक आहवानाने गेहलोत-पायलट यांच्यात समेट

Ashok Gehalot And Sachin Pilot : अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांची भेट घेतली यानंतर गेहलोत आणि पायलट यांच्यात समेट घडवून आणण्यात यश मिळवले.

गोमन्तक डिजिटल टीम

Political Crisis in Rajasthan: काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी अमेरिकेला रवाना होण्यापूर्वी सचिन पायलट आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यातील दीर्घकालीन वाद मिटवण्यात यश मिळवले आहे.

त्यामुळेच गेल्या सोमवारी रात्री झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत कोणत्याही सूत्रावर चर्चा करण्याऐवजी हायकमांडने दोघांनाही भावनिक आवाहन केले.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वाद तीन फॉर्म्युल्यांद्वारे सोडवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र मागच्या दाराने सुरू असलेली चर्चा अंतिम निकालापर्यंत पोहोचू शकली नाही.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष आता राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यात सुरू असलेला वाद संपवण्यावर भर देत आहे. या दोन नेत्यांमधील वादाचा निवडणूक निकालांवर परिणाम होऊ नये, अशी पक्षाची इच्छा आहे. सोमवारी पुन्हा एकदा काँग्रेस हायकमांडकडून दोन्ही नेत्यांमध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला.

राहुल गांधी यांचा पुढाकार

या सर्व प्रकरणामुळे सोमवारी रात्री झालेल्या बैठकीला राहुल गांधी स्वतः पोहोचले. राहुल गांधी यांनी अशोक गेहलोत आणि सचिन पायलट या दोन्ही नेत्यांना सांगितले की, तुमच्या दोघांचे राजकीय व्यक्तिमत्त्व आणि अपेक्षा आम्ही सांभाळू. तुम्ही एकत्र नेतृत्वाखाली निवडणूक लढवा, राजस्थान जिंका. हिमाचल, कर्नाटकानंतर हे राज्य आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये आपण मजबूत आहोत. त्यामुळे राजस्थानमध्ये तुम्ही एकत्रित नेतृत्वाखाली पक्षाला विजयी करा.

बैठकीत कोणत्याही फॉर्मुल्यावर चर्चा नाही

राहुल गांधींच्या या भावनिक आवाहनावर कोणत्याही फॉर्मुल्यावर चर्चा झाली नाही. दोघांनी एकत्र काम करण्याचे आश्वासन दिले आणि सर्व निर्णय घेण्याचे अधिकार राहुल गांधी आणि पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना दिले. त्यामुळेच बैठकीनंतर संघटनेचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी राजस्थानमध्ये संयुक्त नेतृत्वाखाली निवडणुकीत उतरण्याची आणि दोन्ही नेत्यांच्या हायकमांडचा निर्णय मान्य असल्याची घोषणा केली.

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी शेअर केला बैठकीचा फोटो

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून सोमवारी राहुल गांधी, मल्लीकार्जून खरगे आणि गेहलोत-पायलेट यांच्यात झालेल्या बैठकीचा फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत त्यांनी लिहिले की, "पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांनी सचिन पायलट आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याशी चर्चा केली. कर्नाटकातील यशाची पुनरावृत्ती राजस्थानमध्येही करण्यासाठी काँग्रेस पक्ष सज्ज झाला आहे. यासाठी सर्व काँग्रेसजनांनी आतापासूनच एक व्हावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT