Gautam Gambhir Troll Dainik Gomantak
देश

Viral Post: "आता तरी गंभीर व्हा!" विजयाचा पत्ता नाही अन् पराभवांचे रेकॉर्ड्स; नेटकऱ्यांनी गौतम गंभीरला धरलं धारेवर

Gautam Gambhir Troll: रविवारी इंदूरच्या होळकर स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या आणि निर्णायक वनडे सामन्यात न्यूझीलंडने भारताचा ४१ धावांनी पराभव केला.

Sameer Amunekar

भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीर यांची नियुक्ती झाल्यापासून टीम इंडिया एका नव्या युगाकडे वाटचाल करेल, अशी अपेक्षा चाहत्यांना होती. मात्र, वास्तव याच्या अगदी उलट दिसत आहे. रविवारी इंदूरच्या होळकर स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या आणि निर्णायक वनडे सामन्यात न्यूझीलंडने भारताचा ४१ धावांनी पराभव केला. या पराभवानंतर सोशल मीडियावर गंभीरच्या प्रशिक्षकशैलीवर टीकेची झोड उठली आहे.

या पराभवासोबतच भारताने मायदेशातील वनडे मालिका १-२ ने गमावली आहे. विशेष म्हणजे, भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच न्यूझीलंडने भारताला त्यांच्याच भूमीत वनडे मालिकेत धूळ चारली असून, या नामुष्कीनंतर गंभीरच्या प्रशिक्षकशैलीवर टीका केली जात आहे.

गंभीरच्या काळात पराभवांची मालिका

राहुल द्रविड यांच्यानंतर ९ जुलै २०२४ रोजी गंभीरने प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेतली. मात्र, गेल्या काही महिन्यांत भारतीय संघाने अशा काही पराभवांना तोंड दिले आहे, जे क्रिकेट इतिहासात यापूर्वी कधीही घडले नव्हते.

श्रीलंकेविरुद्ध २७ वर्षांनंतर द्विपक्षीय मालिका गमावण्यापासून या घसरणीला सुरुवात झाली. त्यानंतर घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेत झालेला ऐतिहासिक व्हाईटवॉश हा गंभीरच्या प्रशिक्षक कारकिर्दीवरील सर्वात मोठा डाग मानला जात आहे.

विक्रमांची 'गंभीर' पडझड

गंभीरच्या प्रशिक्षणाखाली टीम इंडियाने नको असलेल्या अनेक विक्रमांची नोंद केली आहे. यामध्ये खालील धक्कादायक आकडेवारी आहे:

  • ४५ वर्षांनंतर भारतीय संघ एका संपूर्ण कॅलेंडर वर्षात एकही वनडे सामना जिंकू शकलेला नाही.

  • बेंगळुरू कसोटीत भारत घरच्या मैदानावर पहिल्यांदाच ५० पेक्षा कमी धावसंख्येवर बाद झाला.

  • मायदेशात सलग तीन कसोटी सामने हरण्याची वेळ तब्बल ४७ वर्षांनंतर आली आहे.

  • वानखेडे स्टेडियमवर १२ वर्षांनंतर भारताला पराभवाचा सामना करावा लागला, तर न्यूझीलंडने ३६ वर्षांनंतर भारतात कसोटी सामना जिंकला.

सोशल मीडियावर चाहत्यांचा संताप

कधीकाळी आक्रमक रणनीतीसाठी ओळखल्या जाणाऱ्या गंभीरच्या काळात भारतीय संघाची फलंदाजी आणि फिरकीपटूंना खेळण्याची क्षमता कमकुवत झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारताने पहिल्यांदाच आपले सर्व ३० बळी गमावले, जे भारतीय फलंदाजीच्या खालावलेल्या दर्जाचे लक्षण मानले जात आहे.

या ऐतिहासिक पराभवानंतर बीसीसीआय काही कठोर पावले उचलणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 'गंभीर' मार्गदर्शनाखाली टीम इंडियाला भविष्यातील मोठ्या स्पर्धांमध्ये विजय मिळवण्यासाठी आपली रणनीती पूर्णपणे बदलावी लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Air Pollution: वास्को आणि डिचोलीत वाढला प्रदूषणाचा धोका! हवेची गुणवत्ता चिंताजनक पातळीवर; राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा धडकी भरवणारा रिपोर्ट

Narendra Sawaikar Post Controversy: 'झुरळांसह वाळवी, देशाला वाचवा'... भाजप नेत्याच्या पोस्टने गोव्यात खळबळ; नरेंद्र सावईकर यांच्या विधानावर विरोधकांचा हल्लाबोल!

Candolim Illegal Road Widening: सलमान खानच्या प्रकल्पासाठी बेकायदेशीर रुंदीकरण? आमदार मायकल लोबो अडचणीत; कांदोळीतील नागरिकांचा खळबळजनक आरोप

Advocate Ankur Kumar Attack: पोलिसांना निष्काळजीपणा भोवणार! वकील अंकुर कुमार हल्ल्याप्रकरणी हायकोर्ट संतापले; दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध 24 तासात चौकशी सुरु करा

Horoscope 22 July 2026: कुणाला धनलाभ, तर कुणाला मानसिक ताण! आजचा दिवस ठरणार टर्निंग पॉईंट; 'या' राशींचे चमकणार तारे

SCROLL FOR NEXT