Shah Rukh Khan Dainik Gomantak
देश

Shah Rukh Khan: किंग खानला मिळाला पहिला राष्ट्रीय पुरस्कार, पत्नी गौरीची भावनिक पोस्ट; म्हणाली, 'अनेक वर्षांच्या मेहनतीचं फळ’

National Film Award 2025: आपल्या अभिनयाच्या जोरावर ज्या दिग्गज सेलिब्रिटींनी भारतीय चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवला त्यांच्यासाठी मंगळवारचा दिवस (23 सप्टेंबर) खास ठरला.

Manish Jadhav

National Film Award 2025: आपल्या अभिनयाच्या जोरावर ज्या दिग्गज सेलिब्रिटींनी भारतीय चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवला त्यांच्यासाठी मंगळवारचा दिवस (23 सप्टेंबर) खास ठरला. त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गेल्या महिन्यातच या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या विजेत्यांची घोषणा करण्यात आली होती, पण आज एका भव्य कार्यक्रमात या कलाकारांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. या पुरस्कार सोहळ्यात शाहरुख खान आणि राणी मुखर्जी यांच्यापासून ते मोहनलाल यांच्यासारखे दिग्गज कलाकार उपस्थित होते.

दरम्यान, या सोहळ्यातील सर्वात आनंदाची बातमी म्हणजे सुपरस्टार शाहरुख खानला त्याच्या करिअरमधील पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. हा क्षण पाहून त्याची पत्नी गौरी खान आनंदाने भारावून गेली. सोशल मीडियावर (Social Media) तिने एक भावनिक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आणि या पुरस्कारासाठी घरात एक खास जागा तयार करणार असल्याचेही तिने सांगितले.

गौरी खानची भावनिक पोस्ट व्हायरल

शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि गौरी खान यांच्या प्रेमकथेबद्दल सर्वांना माहितीच आहे. अनेकदा किंग खानने आपल्या यशात पत्नी गौरीचा मोठा वाटा असल्याचे म्हटले. शाहरुख जेव्हा करिअरमध्ये संघर्ष करत होता, तेव्हापासून गौरी त्याच्या सोबत होती आणि आजही ती खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभी आहे. आज शाहरुखला त्याचा पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर, गौरीने सोशल मीडिया हँडलवर अवॉर्ड सोहळ्यातील एक खास फोटो शेअर केला.

हा फोटो शेअर करताना गौरीने शाहरुखला टॅग केले आणि कॅप्शनमध्ये लिहिले, "किती शानदार प्रवास आहे हा...! राष्ट्रीय पुरस्कार जिंकल्याबद्दल खूप खूप अभिनंदन. तू या पुरस्कारासाठी पात्र होता...हे तुच्या कठोर परिश्रम आणि समर्पणाचे फळ आहे...आता मी या पुरस्कारासाठी एक खास जागा डिझाइन करेन." गौरी खानच्या या पोस्टनंतर लगेचच सोशल मीडियावर व्हायरल झाली असून चाहतेही शाहरुखला मोठ्या संख्येने शुभेच्छा देत आहेत.

या पुरस्कार सोहळ्यातील अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यात राणी मुखर्जी, विक्रांत मेस्सी, मोहनलाल, करण जोहर आणि शाहरुख खानसह इतर अनेक दिग्गज कलाकार दिसत आहेत. अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीवर राज्य करणाऱ्या शाहरुख खानसाठी आणि त्याच्या चाहत्यांसाठी आजचा दिवस अत्यंत आनंदाचा ठरला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: नशीब चमकणार! आजचा दिवस 'या' 3 राशींसाठी ठरणार अतिशय शुभ; कारण... आदित्य-मंगल योग

Goa Today News Live: लुथरा बंधु थायलंडमधून डिपोर्ट; दिल्लीत दाखल झाल्यानंतर गोवा पोलिस दोघांना घेणार ताब्यात

Dabolim Airport: दाबोळी विमानतळावर 'ड्राय रन' सराव, धुक्यामुळे उद्भवणाऱ्या व्यत्ययासंदर्भात भागधारकांशी ऑपरेशनल तयारीबाबत चर्चा

IPL 2026: 66 दिवस, 84 सामने... 'आयपीएल 2026'चा थरार 'या' तारखेपासून, फायनलची तारीखही जाहीर

Goa Literacy: साक्षरतेत गोवा देशात प्रथम, दर 99.72 टक्‍के : केंद्रीय शिक्षण राज्‍यमंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT