पणजी: बॉलीवूडचा किंग खान शाहरुखवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. नामांकित शिक्षकतज्ञ आणि शाहरुखसह अनेकांचे मार्गदर्शक राहिलेले एरिक स्टिव्ह डिसोझा यांचे रविवारी गोव्यात निधन झाले. झिसोझा दीर्घ काळापासून पार्किन्सन आजाराशी लढा देत होते.
गोव्यातील वृद्धाश्रात वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डिसोझा यांच्या निकटनर्तीयांनी शाहरुख खानला त्यांची भेट घेण्याचे आवाहन केले होते. पण, दोघांची भेट झालीच नाही.
एरिक स्टिव्ह डिसोझा यांच्या पार्थिवावर बुधवारी (दि.१६ ऑक्टोबर) शिलाँग येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
डिसोझा यांच्या निकटवर्तीनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार, रिगना मंडी, शांती निवास, गोवा येथे रविवारी दुपारी दीड वाजता डिसोजा यांचा मृत्यू झाला. डिसोझा गेल्या काही वर्षांपासून पार्किन्सन आजाराशी लढा देत होते.
डिसोझा यांना दासु या नावाने देखील ओळखले जात होते. दिल्लीतील संत कोलंबिया शाळेत त्यांनी अभिनेता शाहरुखला शिक्षणाचे धडे दिले होते. याशिवाय ते शिलाँगच्या एडमंड शाळेत देखील शिक्षक म्हणून कार्यरत होते. डिसोझांनी पश्चिम बंगाल, दिल्ली, मंगळुरु, आसाम आणि मेघालय येथे ज्ञानदानाचे काम केले आहे.
डिसोझा बृद्धीमान शिक्षक तर होतेच शिवाय त्यांचा नाटक, गाणी लिहण्यात देखील हातकंडा होता. संगणकावर आधारीत चिप इन नावाचे पुस्तक देखील त्यांनी लिहले आहे, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तींनी माहिती दिली.
शाहरुखचे मार्गदर्शक
अभिनेता शाहरुख खान एरिक डिसोझा यांना मार्गदर्शक मानत होता. २००० साली आलेल्या जिना इसिका नाम है या कार्यक्रमात शाहरुखने डिसोझा यांच्याबाबत भाष्य करत त्यांचा मार्गदर्शक असा उल्लेख केला होता.
''झिसोझा यांनी आम्ही शाळेत असताना आम्हाला फुटबॉल, हॉकी खेळायला शिकवले. तरुण वयात असणारी उर्जा योग्य दिशेने वळवली. त्यामुळे आणि टपोरी किंवा बदमाश झालो नाही. ते गिटार वाजवत आमच्यासाठी गाणी देखील म्हणायचे. ते खरोखरच माझ्यासाठी मार्गदर्शक होते', असे शाहरुख म्हणाला होता.
मेघालयाचे मुख्यमंत्री कर्नाड सांगमा यांनी डिसोझा यांच्या निधनावर शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.