Saexual Harassment Dainik Gomantak
देश

हैदराबादमध्ये शाळकरी मुलीवर सामूहिक अत्याचार

आरोपींमध्ये आमदार मुलाचा सहभाग असल्याचा संशय

दैनिक गोमन्तक

हैदराबादमध्ये पुन्हा एकदा देशाला हादरवून टाकणारी घटना घडली आहे. एका शाळकरी अल्पवयीन मुलीवर मित्रांनी बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. संशयितांनी पीडितेला एका चारचाकीमध्ये घेऊन जात हे कृत्य केलं असल्याचं समोर आले आहे. (Gang rape of a schoolgirl in Hyderabad)

सर्व पाच आरोपी विद्यार्थी असून यात एका आमदाराच्या मुलाचा ही समावेश आहे. हे सर्व आरोपी अकरावीत शिकतात तर पीडिता बारावीत शिकत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या कृत्यात समावेश असणारे संशयित हे राजकियदृष्ट्या प्रभावशाली कुटुंबातील आहेत. या घटनेत सहभागी आऱोपी हे एकापेक्षा जास्त असले तरी पोलीसांनी आमदाराचा मुलाचा सामूहिक बलात्कारात त्याचा सहभाग नसावा अशी शक्यता वर्तवली आहे.

सायंकाळी 17 वर्षीय युवती आपल्या मित्रासोबत पबमध्ये गेली होती. यानंतर ती घराकडे परतत असताना पबमध्ये ओळख झालेल्या मुलासोबत घरी सोडतो असं सांगितल्याने परतत असताना यावेळी तीचे मित्र ही या कारमध्ये होते. यावेळी हा प्रकार घडला असावा असा पोलिसांनी अंदाज व्यक्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्युबिली हिल्स येथे आरोपींनी कार थांबवत मुलीवर बलात्कार केला. दरम्यान ज्या आमदाराच्या मुलाचं नाव समोर येत आहे.

त्याने या घटनेआधी भीतीपोटी गाडीतून खाली उतरत पळ काढला असा दावा आहे. मुलीच्या वडिलांनी शरिरावरील जखमा पाहिल्यानंतर विचारपूस केली असता मुलीने काही मुलांनी पबमध्ये आपल्या हल्ला केल्याची खोटी माहिती दिली. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. पण नंतर मुलीने बलात्कार झाल्याचं सांगितलं असता बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.यावर पोलीसांनी फुटेजच्या आधारे याबाबत कसून चौकशी सूरु असून लवकरच सर्व आरोपींना गडाआड करण्यात यश मिळेल असा विश्वास ही व्यक्त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT