''भारतात धार्मिक स्थळे आणि अल्पसंख्याकांवर हल्ले वाढले''

पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि चीनमध्ये हीच स्थिती असल्याचं केलं स्पष्ट - अमेरिका परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन
Antony Blinken
Antony Blinken Dainik Gomantak
Published on
Updated on

रशियाशी वाढत्या आयातीमूळे भारताबाबत नाराजीची सूर अमेरीका गेले काही दिवस आळवताना दिसत होता. आता मात्र अमेरिका भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार बनला आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी भारताबाबत मोठे वक्तव्य केले आहे. भारतातील नागरिक आणि धार्मिक स्थळ यांच्यावर हल्ले वाढत असल्याचा दावा करण्यात आला आहे. असे असताना अमेरिका जगाच्या कानाकोपऱ्यात धार्मिक स्वातंत्र्याचे समर्थन करत असल्याचं ब्लिंकन यांनी स्पष्ट केलं आहे. ( Attacks on religious places and minorities increase in India )

ब्लिंकन यांनी भारताविषयी आपले मत व्यक्त करताना म्हणाले कि, भारत हा जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे, तेथे अनेक धर्माचे लोक राहतात. आणि भारतातील लोक आणि धार्मिक स्थळांवर हल्ले होत असल्याचे आपण पाहिले आहे. व्हिएतनाममधील अधिकारी नोंदणी नसलेल्या धार्मिक समुदायांच्या सदस्यांना त्रास देत आहेत. नायजेरियामध्ये, काही राज्यांची सरकारे त्यांच्या श्रद्धा व्यक्त केल्याबद्दल त्यांना बदनामी आणि ईशनिंदा कायद्यांतर्गत शिक्षा करतात.

Antony Blinken
काश्मीरमधील टार्गेट किलिंगच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानला खडसावले

अँटोनी ब्लिंकन यांनी नुकताच आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्यावरील वार्षिक अहवाल सादर केला. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. तसेच जगभरातील इतर राष्ट्रांविषयी बोलताना ब्लिंकन म्हणाले कि, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि चीन तेथे ही अल्पसंख्याक समाज आणि महिलांना लक्ष्य केले जात आहे. चीनबद्दल बोलताना म्हणाले की, चीनमध्ये बौद्ध, ख्रिश्चन, मुस्लिम आणि ताओवादी समुदायाच्या लोकांची धार्मिक स्थळे नष्ट करण्यात आली आहेत. तिबेटी बौद्ध, ख्रिश्चन, मुस्लीम इत्यादी लोकांना तेथे घर आणि रोजगार दिला गेला नाही, असे असाताना अमेरिका मात्र जगाच्या कानाकोपऱ्यात धार्मिक स्वातंत्र्याचे समर्थन करत शांततेसाठी प्रयत्नशिल असल्याचं ते म्हणाले.

Antony Blinken
America: अंत्यसंस्काराच्या वेळी स्मशानभूमीतच झाडल्या गोळ्या, अनेकजण जखमी

अमेरिका बनला भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार

गेल्या आर्थिक वर्षात (2021-22) अमेरिका भारताचा दुसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार बनला आहे. यावरून दोन्ही देशांमधील मजबूत आर्थिक संबंध दिसून येतात. अशा प्रकारे भारतासोबतच्या व्यापारात अमेरिकेने चीनला मागे टाकले आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 2021-22 मध्ये अमेरिका आणि भारत यांच्यातील द्विपक्षीय व्यापार $119.42 अब्ज इतका वाढला आहे. 2020-21 मध्ये हा आकडा $80.51 अब्ज होता.

आकडेवारीनुसार, भारताची अमेरिकेला निर्यात 2021-22 मध्ये $ 76.11 अब्ज झाली आहे जी मागील आर्थिक वर्षात $ 51.62 अब्ज होती. त्याच वेळी, अमेरिकेतून भारताची आयात वाढून $43.31 अब्ज झाली, जी मागील आर्थिक वर्षात $29 अब्ज होती. आकडेवारीनुसार, भारत-चीन द्विपक्षीय व्यापार 2020-21 मध्ये $86.4 अब्ज वरून 2021-22 मध्ये $115.42 अब्ज होता.2020-21 मधील 21.18 अब्ज डॉलरवरून आर्थिक वर्षात चीनला भारताची निर्यात किरकोळ वाढून $21.25 अब्ज झाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com