Crime News Dainik Gomantak
देश

Uttar Pradesh Crime: इंस्टाग्रामवर हिंदू बनून अल्पवयीन मुलीशी मैत्री, बलात्कारानंतर जबरदस्तीने...; दोघेजण गजाआड

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिचे जबरदस्तीने धर्मांतर केल्याची घटना समोर आली आहे.

Manish Jadhav

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिचे जबरदस्तीने धर्मांतर केल्याची घटना समोर आली आहे. कल्याणपूर पोलिसांनी झाशी जिल्ह्यातील दोन तरुणांना अटक केली आहे.

इंस्टाग्रामवर अल्पवयीन मुलीशी मैत्री करुन बलात्कार केल्याचा आरोप तरुणावर आहे. तसेच, तो अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने धर्मांतर करण्यास भाग पाडत होता.

दरम्यान, मुलीला अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. यासोबतच संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकीही त्याने दिल्याचे कळत आहे.

लकी आणि त्याच्या मित्राने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला

दुसरीकडे, हा अश्लील एडिट केलेला फोटो दाखवून लकीने तिला भेटण्यासाठी दबाव टाकला. यानंतर एके दिवशी लकी या अल्पवयीन मुलीला (Girl) भेटण्यासाठी शाळेबाहेर पोहोचला.

जिथे तो तिला त्याच्या कारमधून कल्याणपूर परिसरातील एका हॉटेलमध्ये घेऊन गेला. यावेळी त्याचा मित्रही त्याच्यासोबत होता. जिथे लकी आणि त्याच्या मित्राने तिच्यावर बलात्कार केला.

सक्तीचे धर्मांतर

यासोबतच दोघांनी तिचा अश्लील व्हिडिओही बनवला. यादरम्यान लकीने मुलीचे धर्मांतर करुन त्याच्याशी लग्न करण्यास भाग पाडले. हे ऐकून अल्पवयीन मुलीने हॉटेलमध्येच विरोध करण्यास सुरुवात केली.

त्यानंतर, हॉटेलच्या कर्मचाऱ्यांसह आजूबाजूचे लोक जमा झाले. यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून लकी आणि त्याच्या साथीदाराला अटक केली.

मैत्रीपूर्वी स्वत:ला हिंदू म्हणवत असे

या प्रकरणात, अल्पवयीन मुलीने पोलिसांना (Police) सांगितले की, ''इंस्टाग्रामवर मैत्री झाली तेव्हा लकी स्वतःला हिंदू म्हणवत असे. हळूहळू तो मुस्लीम असल्याचे कळल्यावर मी बोलणे बंद केले. यानंतर लकीने अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली.

त्याला भेटण्याचा दबाव होता. मग एके दिवशी लकीने मला बोलावून हॉटेलमध्ये नेले. जिथे लकी आणि त्याच्या साथीदारांनी माझ्यावर सामूहिक बलात्कार केला. यादरम्यान त्यांनी धर्मांतरासाठी दबावही निर्माण केला.''

पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल

या संपूर्ण प्रकरणात कल्याणपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी धनंजय पांडे यांनी सांगितले की, पीडितेच्या तक्रारीवरुन आरोपींवर अपहरण, बलात्कार आणि चुकीच्या उद्देशाने जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

यासोबतच पॉस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पुढे सांगितले की, अल्पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. न्यायालयात अल्पवयीन मुलाचे जबाबही नोंदवले जाणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT