Job  Dainik Gomantak
देश

'या' टॉप चार IT कंपन्यांमध्ये फ्रेशयर्सला मिळणार नोकरीची संधी

फ्रेशर्सला या टॉप चार आयटी कंपन्यांमध्ये मिळणार नोकरीची सुवर्णसंधी

दैनिक गोमन्तक

आयटी क्षेत्रात बंपर भरतीचे युग यापुढे सुरू राहणार आहे. यामुळे युवकांना नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहेत. या आर्थिक वर्षात देशातील टॉप चार आयटी कंपन्यांची (IT Company) एकूण नियुक्ती 2 लाखांच्या पुढे जाईल. यात टीसीएस (TCS) , इन्फोसिस (Infosys) , विप्रो (Wipro) आणि एचसीएल टेक (HCL Technologies) द्वारे केल्या जात आहेत.

* नोकऱ्या सोडण्याचा वाढता वेग

आयटी कंपन्यांच्या डिसेंबरच्या तिमाही निकालांमध्ये हायरिंग डेटाची माहिती देण्यात आली आहे. खर तर, आयटी कंपन्या त्याच्या नोकऱ्या वाढत्या संख्येमुळे हैराण आहेत. याशिवाय, जवळजवळ सर्व क्षेत्रे आता आयटी (IT) पायाभूत सुविधा मजबूत करण्यात गुंतलेली आहेत, ज्यामुळे आयटी कंपन्यांमध्ये पूर्वीपेक्षा जास्त ऑर्डर येत आहेत. या कारणांमुळे नोकरी (Job) सोडणाऱ्यांची रिक्त पदे भरण्याची आणि वाढीव ऑर्डरसाठी नवीन लोकांची नियुक्ती करण्याची दुहेरी जबाबदारी आयटी कंपन्यांवर असते.

* TCSमध्ये पुढील तीन महिन्यात 30 हजार नोकरींची संधी

देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टीसीएस ने 2021-2022 या आर्थिक वर्षात 55 हजार फ्रेशर्सची भरती करण्याचे लक्ष्य ठेवले होते. कंपनीने हे लक्ष्य आधीच ओलांडले असून 77 हजार नोकऱ्या केल्या आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत कंपनी आणखी 30 हजार कामगारांची भारती करणार आहे. अशा प्रकारे, या आर्थिक वर्षात टीसीएस ची एकूण भरती 1 लाखांच्या पुढे जाईल. भारतीय आयटी कंपनी एका वर्षात एक लाखाहून अधिक लोकांची भरती करण्याची ही पहिलीच वेळ असेल.

दुसऱ्या क्रमांकावर असलेली आयटी कंपनी इन्फोसिसमध्ये नोकऱ्या सोडणाऱ्या लोकांचा प्रश्न अधिक गंभीर आहे. इन्फोसिसमध्ये हा दर 25.5 टक्के आहे. याला सामोरे जाण्यासाठी इन्फोसिसने या आर्थिक वर्षात 55 हजार लोकांची भरती करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्याचप्रमाणे, विप्रोचे लक्ष्य 17,000 फ्रेशर्सना कामावर घ्यायचे आहे. मार्च 2022मध्ये संपणाऱ्या आर्थिक वर्षात एचसीएल टेकची एकूण नियुक्ती 44 हजारांवर पोहोचल. अशा प्रकारे, या आर्थिक वर्षात चार टॉप आयटी कंपन्या एकूण 2.16 लाख नियुक्ती करणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT