West Bengal Crime | Mobile Game Dainik Gomantak
देश

West Bengal Crime: मित्रच बनले वैरी! मोबाईल गेमसाठी 18 वर्षीय मित्राची निर्घुण हत्या; अन् नंतर...

West Bengal Crime News: पोलिसांनी या गंभीर खून प्रकरणाचा पर्दाफाश करत चारही शाळकरी मुलांना अटक केली आहे.

Manish Jadhav

West Bengal Crime News: पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात मोबाईल गेमवरुन झालेल्या भांडणानंतर 15 ते 17 वयोगटातील चार शाळकरी मुलांना त्यांच्या 18 वर्षीय मित्राची हत्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. अल्पवयीन मारेकऱ्यांच्या कबुलीमुळे पोलिसही आश्चर्यचकित झाले आहेत. त्यांनी आपल्या मित्राची निर्घृण हत्या केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्याच्या डोक्यात काठीने वार करुन त्याची हत्या केली. मृत्यूची खात्री करण्यासाठी प्रथम नायलॉनच्या दोरीने गळा आवळून नंतर विळ्याने गळा कापण्यात आला. एवढेच नाही तर पुरावे नष्ट करण्यासाठी त्याच्या शरीराचे भागही जाळले.

दरम्यान, ही घटना 8 जानेवारी रोजी घडल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी या गंभीर खून प्रकरणाचा पर्दाफाश करत चारही शाळकरी मुलांना अटक केली आहे. मारेकऱ्यांचे वय 15 ते 17 वर्षांच्या दरम्यान असल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपींच्या कबुलीजबाबाने पोलीसही चकित झाले. पोलिसांचे म्हणणे आहे की, त्यांनी केवळ खूनच केला नाही तर मृतदेहाची विटंबनाही केली.

खून केल्यानंतर मृतदेहाची विटंबना

पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, मोबाईल गेमवरुन झालेल्या भांडणानंतर मारेकऱ्यांनी त्यांच्या 18 वर्षीय मित्राच्या डोक्यावर काठीने वार केला. तो बेशुद्ध झाल्यावर मृत्यूची खात्री करण्यासाठी नायलॉनच्या दोरीने त्याचा गळा दाबून खून करण्यात आला. एवढेच नाही तर खून झाला आहे यावर त्यांचा विश्वास बसत नसल्याने त्यांनी कुठूनतरी रेझर ब्लेड आणि एक विळा आणला. त्याच्या मदतीने त्यांनी त्याचा गळा कापला. खुनाची खात्री झाल्यानंतर त्यांनी आऊटलेटमधून अर्धा लिटर पेट्रोल आणले. यानंतर हाताच्या बोटांचे ठसे राहिले असावेत या भीतीने त्यांनी त्याच्या अंगावर पेट्रोल शिंपडून पेटवून दिले.

जंगीपूरचे पोलीस अधीक्षक आनंद रॉय यांनी माध्यमांना सांगितले की, “चारही जणांनी हत्येची कबुली दिली आहे. त्यांना गुरुवारी बाल न्याय बोर्डासमोर हजर करण्यात आले आणि त्यांची रवानगी बेरहामपूर येथील बाल कारागृहात करण्यात आली. आरोपींपैकी दोन नववीत, एक दहावीत आणि चौथा अकरावीत शिकतो. चौघांविरुद्ध भादंवि कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.''

दरम्यान, 8 जानेवारीच्या रात्री या मुलाची हत्या झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तर 15 जानेवारी रोजी फरक्का बॅरेजजवळील झाडीमध्ये त्याचा विकृत अवस्थेतील मृतदेह सापडला होता. पीडित मुलाच्या आईने 11 जानेवारी रोजी पोलिसात आपला मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्याचे वडील गवंडी म्हणून काम करतात.

भांडण कशावरुन होतं?

दरम्यान, हा सर्व प्रकार मोबाईल गेमवरुन झालेल्या वादातून झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. पीडित मुलाने मोबाईल गेम खेळण्यासाठी त्याच्या मित्राकडून 2000 रुपयांना लॉग-इन आयडी खरेदी केला होता. मात्र, चौघांपैकी एकाने लॉग-इन आयडी चोरला, त्यामुळे मित्रांमध्ये भांडण झाले. शिक्षण अर्धवट सोडलेल्या पीडित मुलाने गुन्हेगारांच्या संपर्कात असल्याचा दावा करत चौघांना भीषण परिणामाची धमकी दिली होती, त्यानंतर चौघांनी त्याची हत्या केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panjim Fire: सेरेंडिपीटी महोत्सवाच्या सेटला लागली आग, कर्मचाऱ्यांनी दाखवली तत्परता, पणजीत टळली मोठी दुर्घटना; Watch Video

Viral Video: शाळेच्या भिंतीवरुन उडी मारुन शेडवर उतरले, पण खाली पाहतो तर काय... क्लास बंक करणं पठ्ठ्याला पडलं महागात; पोरीनं काढला पळ

ICC Fine Team India: रोहित, विराटसह सर्वच खेळाडूंना धक्का! 'आयसीसी'ने ठोठावला दंड; एकदिवसीय मालिकेतील 'ती' चूक पडली भारी

Crime News: थंडीत मरण्यासाठी उंच पर्वतावर सोडलं, फोन सायलेंट केला, ब्लँकेटही दिलं नाही; गिर्यारोहक बॉयफ्रेंडनं गर्लफ्रेंडला मारलं? काय नेमकं प्रकरण?

Indigo Flights: मोपा विमानतळावर 8 तर दाबोळीत 9 विमाने रद्द; इंडिगोच्या गोंधळामुळे मुंबई, दिल्लीसह प्रमुख शहरांचे प्रवास ठप्प

SCROLL FOR NEXT