Sunil Jakhar Dainik Gomantak
देश

पंजाब काँग्रेसला मोठा झटका, ज्येष्ठ नेते सुनील जाखड यांचा पक्षाला रामराम

पंजाब (Punjab) काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुनील जाखड यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याची घोषणा केली आहे.

दैनिक गोमन्तक

पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुनील जाखड यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याची घोषणा केली आहे. त्यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरुन लाईव्ह करत काँग्रेस सोडण्याची घोषणा केली. फेसबुक लाईव्ह दरम्यान जाखड यांनी काँग्रेस नेत्या अंबिका सोनी यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांनी सोनिया गांधींनाही अनेक प्रश्न विचारले. राजस्थानच्या उदयपूरमध्ये होणाऱ्या 'चिंतन शिबिर'पूर्वी सुनील जाखड यांनी थेट काँग्रेसवर हल्ला करण्याचा विचार सोडून दिला होता. जाखड यांनी यापूर्वी 13 मे रोजी उदयपूरमध्ये पत्रकार परिषद घेण्याचे ठरवले होते, परंतु नंतर त्यांनी तसे केले नाही.

दरम्यान, काँग्रेसने नुकतेच सुनील जाखड यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत त्यांना पक्षाच्या सर्व पदांवरुन हटवले आहे. पंजाब काँग्रेसने त्यांना पक्षातून दोन वर्षांसाठी निलंबित करण्याची शिफारस केली होती, त्यावर आता सोनिया गांधींना (Sonia Gandhi) निर्णय घ्यावा लागला. काँग्रेसच्या शिस्तपालन कृती समितीने गेल्या महिन्यात 11 एप्रिल रोजी के.व्ही थॉमस यांना अनुशासनहीनतेच्या आरोपांवर कारणे दाखवा नोटीस बजावली होती. एका आठवड्यात उत्तर देण्यास सांगण्यात आले होते. आपल्या फेसबुक लाईव्हमध्ये जाखड यांनी आता पक्षाशी कोणताही संबंध नसून 'चिंतन शिबिर' ही केवळ औपचारिकता असल्याचे सांगितले.

चिंतनशिवार मदत करणार नाही - सुनील जाखड

ते पुढे म्हणाले की, 'आज काँग्रेस (Congress) डळमळीत झाली आहे. त्यामुळे 'चिंतनशिविर'चा काहीही फायदा होणार नाही. पक्षाला स्वतःमध्ये सुधारणा करावी लागेल. काळजी करण्याची गरज नाही, खरचं काळजी असती तर काँग्रेसने उत्तर प्रदेशातील पराभवासाठी समिती स्थापन केली असती.' '403 पैकी 300 जागांवर काँग्रेसच्या उमेदवाराला 2 हजारही मते कशी मिळाली नाहीत, याचे कारण शोधले पाहिजे. यापेक्षा जास्त मते पंचायतीच्या उमेदवारालाच मिळतात. याला उमेदवार नसून सर्वोच्च नेते आणि पक्षनेतृत्व जबाबदार आहे, त्यामुळेच काँग्रेसची ही दुर्दशा झाली असल्याचे जाखड म्हणाले.

भगवंत मान यांनी सुनील जाखड यांची सुरक्षा कमी केली

सुनील जाखड यांच्यावर विधानसभा निवडणुकीदरम्यान पक्षाविरोधात वक्तव्य आणि माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी (Charanjit Singh Channi) यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप होता. जाखड यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी काँग्रेस नेते उदित राज यांनी उघडपणे केली होती. अलीकडेच, आम आदमी पार्टीच्या (Aam Aadmi Party) नेतृत्वाखालील पंजाब सरकारने सुनील जाखड यांच्यासह राज्यातील आठ वरिष्ठ नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Taxi: गोव्यात लवकरच धावणार पाण्यावरची टॅक्सी! कोचीचे पथक करणार पाहणी; प्रवाशांना मिळणार नवा पर्याय

Goa News Live: ओपा पाणी प्रक्रिया प्लांटमध्ये विद्युत बिघाड, तिसवाडी, फोंड्यात मर्यादीत पाणी पुरवठा

Goa Politics: खरी कुजबुज; पैशांसाठी भारतीय स्त्रिया बनल्या विधवा?

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

SCROLL FOR NEXT