Former Madhya Pradesh Chief Minister Kamal Nath Dainik Gomantak
देश

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा दिला राजीनामा

मध्य प्रदेशचे (Madhya Pradesh) माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे.

दैनिक गोमन्तक

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांचे निकटवर्तीय डॉ. गोविंद सिंग (Dr. Govind Singh) हे विरोधी पक्षनेतेपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. माजी मुख्यमंत्री कमलनाथ आता केवळ पीसीसी प्रमुखपद भूषवतील. त्याचवेळी काँग्रेस पक्षाने क्षणाचाही विलंब न लावता कमलनाथ यांचा राजीनामा तात्काळ स्वीकारला आहे. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी यास दुजोरा दिला आहे. त्याचवेळी काँग्रेसचे (Congress) सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी कमलनाथ यांना लिहिलेल्या पत्रात पक्षाध्यक्षांनी तुमचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा तात्काळ स्वीकारला आहे.

ते पुढे म्हणाले की, ''विरोधी पक्षनेता म्हणून तुमच्या योगदानाचे पक्षाला कदर आहे. यासोबतच काँग्रेस अध्यक्षांनी डॉ.गोविंद सिंग यांना विरोधी पक्षनेते करण्याचा प्रस्तावही मान्य केला आहे. डॉ. गोविंद सिंह 7 वेळा आमदार आहेत.''

दरम्यान, राज्याच्या राजकारणात डॉ. गोविंद सिंह हे दिग्विजय सिंह (Digvijay Singh) यांचे निकटवर्तीय मानले जातात. ग्वाल्हेर चंबळ भागात डॉ. गोविंद सिंह यांनी ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia) यांच्या विरोधात आवाज उठवत काँग्रेस पक्षाचा मोर्चा खोलला होता.

'माझी जबाबदारी पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडेन'

तर दुसरीकडे, प्रसारमाध्यमांशी बोलताना डॉ.गोविंद सिंग यांनी पक्षाने दिलेली जबाबदारी पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडणार असल्याचे सांगितले. काँग्रेस पूर्वीही मजबूत होती आणि आजही मजबूत आहे. पक्षाविरोधात जे काही षडयंत्र रचले गेले, त्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल. हे सरकार करत असलेल्या अत्याचाराविरोधात काँग्रेस लढणार आहे. त्याचबरोबर सचिवालयावर काँग्रेसचा झेंडा फडकवण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT