Manish Sisodia  Dainik Gomantak
देश

Manish Sisodia Judicial Custody: मनीष सिसोदिया यांना मोठा झटका, न्यायालयाने सुनावली 14 दिवसांची कोठडी

Manish Sisodia Judicial Custody: दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते मनीष सिसोदिया यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत.

Manish Jadhav

Former Deputy Chief Minister of Delhi Manish Sisodia: दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते मनीष सिसोदिया यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. दारु घोटाळ्यात अटक करण्यात आलेल्या सिसोदिया यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

सिसोदिया यांना 20 मार्चपर्यंत तिहार तुरुंगात राहावे लागणार आहे. मात्र, त्यांच्या जामीन अर्जावरही 10 मार्च रोजी सुनावणी होणार आहे.

दरम्यान, आप नेते सिसोदिया यांनी न्यायालयीन कोठडीत औषधे, डायरी, पेन आणि भगवद्गीता तुरुंगात ठेवण्याची परवानगी मागितली. सिसोदिया यांना मेडिटेशन सेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. सिसोदिया आतापर्यंत एकूण 7 दिवसांच्या सीबीआय रिमांडवर आहेत.

सीबीआयने (CBI) 8 तासांहून अधिक काळ चौकशी केल्यानंतर 26 फेब्रुवारी रोजी आप नेते सिसोदिया यांना अटक केली होती.

तसेच, 27 फेब्रुवारी रोजी राऊस अव्हेन्यू कोर्टाने सिसोदिया यांना 4 मार्चपर्यंत सीबीआय कोठडीत पाठवले होते, जेणेकरुन त्यांची सविस्तर चौकशी करता येईल. दरम्यान, सिसोदिया यांनी सर्वोच्च न्यायालयातही (Supreme Court) जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला.

सिसोदिया यांना 4 मार्च रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश एमके नागपाल यांनी त्यांना आणखी दोन दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली होती. त्यानंतर सीबीआयने कोर्टाकडे तीन दिवसांची कोठडी मागितली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

श्रीलंकेत ‘दित्वा’ चक्रीवादळाचा हाहाकार! पूर आणि भूस्खलनात 47 जणांचा मृत्यू, 21 बेपत्ता; भारतालाही धोक्याचा इशारा VIDEO

Partgali Math Goa: पैंगिणीतल्या 'पर्वत कानन' स्थळी मूर्ती जड झाल्या, गायीने प्रकट होऊन जागा दाखवली; श्रीसंस्थान गोकर्ण पर्तगाळ

PAK vs SL: पाकिस्तानची पुन्हा लाज गेली! 6 चेंडूत 10 धावा जमल्या नाही, श्रीलंकेसमोर टेकले गुडघे Watch Video

Cash For Job: नोकरीसाठी पैसा दिला, तरी ‘इतका आला कुठून?’ असे विचारत ED मागे लागते; पैसे देऊन अवलक्षण

अग्रलेख: गोव्यात 'दरोडा' घालायचा विचार जरी मनात आला, तरी कापरे भरेल अशी जरब व भीती बसणे शक्य आहे..

SCROLL FOR NEXT