Big Brother
Big Brother Dainik Gomantak
देश

सिध्दू पाकिस्तानचे कौतुक करु शकतात तर...

दैनिक गोमन्तक

कर्तारपूर साहिबच्या दौऱ्यावर असलेले काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू (Punjab Congress President) यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Pakistan Prime Minister Imran Khan) यांना आपला ‘मोठा भाऊ’ (Big brother) म्हणून संबोधल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाकडून (Bharatiya Janata Party) करण्यात आला आहे. भाजपने याप्रकरणी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Former Congress President Rahul Gandhi) यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले आहे.

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस (BJP National General Secretary) तरुण चुग यांनी ट्विट केले की, "पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांनी पाकिस्तानला भेट देऊन पुन्हा एकदा पाकिस्तानबद्दलचे प्रेम दाखवले आहे. सिद्धूनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना मोठे भाऊ असे वर्णन केले आहे.'' ''फक्त नवज्योतसिंग सिद्धूच पाकिस्तानचे कौतुक करू शकतात, देशाच्या जवानांवर गोळीबार केला आणि ड्रग्ज आणि शस्त्रास्त्र देशात पाठवले. यावर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्पष्टीकरण द्यावे.

त्याचवेळी भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले की, "कोट्यवधी भारतीयांसाठी ही चिंतेची गंभीर बाब आहे." त्यांनी दावा केला की, सिद्धूंचे वक्तव्य हे केवळ घटना नसून ती काँग्रेसची सवय बनली आहे. ज्या पक्षात त्यांचे नेते हिंदुत्वाला लक्ष्य म्हणुन साधतात आणि पाकिस्तानचा गौरव करतात. काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकाचा संदर्भ देत पात्रा म्हणाले की, विरोधी पक्ष बोको हराम आणि इसिस सारख्या दहशतवादी संघटनांना हिंदुत्वात पाहतो तर खानमध्ये "भाई जान".

असे करण्यामागे काँग्रेसचे तुष्टीकरणाचे राजकारण हेच एकमेव कारण आहे कारण भारतामध्ये असा एक वर्ग असेल जो पाकिस्तानचे गौरव करण्यात आनंदी असेल असे त्यांना वाटत होते. पात्रा यांनी आठवण करून दिली की सिद्धू यांनी यापूर्वी पाकिस्तान आणि पाकिस्तानी पंतप्रधानांची प्रशंसा केली होती आणि लष्कर प्रमुख कमर बाजवा यांना मिठी देखील मारली होती.

पंजाब काँग्रेस अध्यक्ष सिद्धू यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एक पाकिस्तानी अधिकारी इम्रान खानच्या वतीने त्यांचे स्वागत करताना दिसत आहे आणि पंजाब काँग्रेस अध्यक्ष सिद्धू, खान हे त्यांचे 'मोठे भाऊ' असल्याचे सांगत आहेत आणि मी त्यांच्यावर खूप प्रेम करतो असे म्हणताना दिसत आहेत. अलीकडेच भारताने करतारपूर कॉरिडॉर उघडला आहे. भारत सरकारने मंगळवारी यासंदर्भात एक घोषणा केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lairai Jatra: लईराई देवीचा जत्रोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा; भाविकांचा लोटला महापूर

Netravali: कदंबच्या 'त्या' कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करणार : वनमंत्री राणे

Yellow Alert In Goa: गोव्यात दोन दिवस यलो अलर्ट, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

Mukesh Ambani: मुकेश अंबानी लवकरच करणार 150 अब्ज डॉलर्सच्या मार्केटमध्ये एन्ट्री? ‘या’ क्षेत्रात आजमावणार हात

गोव्यात लवकरच AI द्वारे होणार फुफ्फुसाच्या कर्करोगाची तपासणी, आरोग्य मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT