'या' शब्दांच्या पासवर्ड पासून सावधान रहा!

भारतीय लोकांमध्ये नाव आणि लोकप्रिय पासवर्ड (Password) म्हणून तयार करण्याचा ट्रेंड (Trends) आहे, असे या अहवलात आहे.
Password
PasswordDainik Gomantak

ई-मेल, ऑनलाइन पेमेंट, नेटबँकिंग, सोशल मीडियाचे विविध अॅप (App) आदी गोष्टींचा वापर सर्वच लोक करत आहेत. तर हे लोकांच्या जीवनावश्यक गोष्ट बनली आहे. युजर्सची माहिती सुरक्षित राहावी यासाठी सर्वत्र पासवर्डचा टाकला जातो. या विविध पासवर्डमुळे यूझर्सची (users) वैयक्तिक माहिती सुरक्षित असते. प्रत्येक युजर लक्षात राहिल असाच पासवर्ड ठेवावा असा सल्ला सायबर तज्ञ देतात.

नॉर्डपासने (NordPass) पासवर्ड बाबतचा एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालामध्ये भारतामध्ये सर्वात जास्त वापरात असणाऱ्या पासवर्डची ही यादी आहे. यामध्ये असे पासवर्ड समाविष्ट आहेत, जे ऐकून याचा धक्काच बसेल.

Password
कोरोनाचा कहर, तरीही IFFIत 96 देश 624 प्रवेशिका!

नॉर्डपासच्या अहवालानुसार, सर्वाधिक वापरला जाणारा पासवर्ड हा 1 ते 6 अंक असा आहे. यामधील अशी गोष्ट म्हणजे 2020 मध्ये या पासवर्डचा वापर सुमारे 25 लाख 43 हजार वेळा वापरला होता. तसेच 2021 मध्ये त्याचा आकडा 1 कोटीपेक्षा जास्त आहे. यातून युजर्स स्वतःबद्दलच्या डेटा, माहिती बद्दल किती निष्काळजी आहेत हे या अहवाल दिसून येते. युजर्सची महत्त्वाची माहिती असलेल्या खात्यांसाठी स्ट्रॉंग पासवर्ड पाहिजे. परंतु साधारणत: लोक सोपे असलेले पासवर्ड (Password) जास्त वापरतात. परंतु हे पासवर्ड सुरक्षेच्या दृष्टीने कमकुवत आहेत.

तसेच, नॉर्डपासच्या संशोधनानुसार, भारतीय लोक पासवर्डसाठी जागरूक नाहीत. या अहवालानुसार भारतीय लोकांकडून (Indian people) सर्वात जास्त वापरला जाणारा पासवर्ड हा ‘पासवर्ड’ शब्दच असतो. हा पासवर्ड भारताव्यतिरिक्त, जपानमध्ये ही मोठ्या वापरला गेला आहे. या व्यतिरिक्त विविध कॉमन पासवर्ड देखील भारतामध्ये वापरले जातात. यामध्ये iloveyou, कृष्णा, omsairam आणि sairam अश्यांचा मोठ्या प्रमाणत समावेश आहे. तसेच, 1 ते 5 आणि QWERTY हे पासवर्ड यांच्या यादीत अव्वल आहेत. हे पासवर्ड फक्त भारतातच नव्हे तर जगभरात देखील लोकप्रिय आहेत.

Password
इंदूर स्वच्छता सर्वेक्षणात सलग पाचव्यांदा आघाडीवर

भारतीय लोकांमध्ये नाव आणि लोकप्रिय पासवर्ड म्हणून तयार करण्याचा ट्रेंड आहे, असे या अहवलात आहे. भारतामध्ये सर्वात जास्त वापरले जाणारे पासवर्डमध्ये 1 ते 8 , 1 ते 9, 123123, abcd1234, qwerty, abc123, india123, indya123, xxx आणि 1qaz यांचा वापर केला जातो.

कसे ठेवायचे सुरक्षित पासवर्ड:

  • पासवर्ड ठराविक काळाने बदलला पाहिजे.

  • एकच पासवर्ड सर्व अकाऊंटसाठी वापरू नये. बँकिंग किंवा ट्रेडिंग अकाऊंचा पासवर्ड ठेवण्यासाठी अल्फाबेट, नंबर आणि स्पेशल कॅरेक्टरचा वापर केला पाहिजे.

  • जन्मतारीख, स्वतःचे नाव, किंवा जवळच्या व्यक्तीचे नाव, जन्मतारीख पासवर्डमध्ये वापरू नये.

  • पासवर्डमध्ये कमीत कमी आठ कॅरेक्टर पाहिजेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com