Hit And Run Dainik Gomantak
देश

माजी कॉंग्रेस आमदाराची पत्नी ठरली Hit and Run ची शिकार

Ashutosh Masgaunde

दिल्ली काँग्रेसचे माजी आमदार राजेश लिलोथिया यांच्या पत्नी मधु लिलोथिया यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. ही घटना सोमवारी काश्मिरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

मधु लिलोथिया बलेनो कारमधून प्रवास करत असताना त्यांना भरधाव वेगाने येणाऱ्या ब्रेझा कारने धडक दिली.

मधु यांना ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात आले मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी कार चालकाला अटक केली आहे. जैनुल असे आरोपीचे नाव असून तो सीलमपूरचा रहिवासी आहे.

अपघातानंतर आरोपीने कारसह घटनास्थळावरून पळ काढला. तपासाअंती पोलिसांनी आरोपी जैनुल (24, रा. गढी-मेंदू सीलमपूर) याला अटक केली आणि कार जप्त केली.

एका अधिकाऱ्याने सांगितले, “आम्ही आनंद पर्वत ते शाहदरा उड्डाणपुलापर्यंतचे सीसीटीव्ही कॅमेरे स्कॅन केले आणि आरोपीचे वाहन (मारुती ब्रेझा) शोधण्यात आम्हाला यश आले.” त्यांनी कारच्या मालकाची ओळख पटवली आणि गाडी सीलमपूर येथे शोधून काढली.

संशयिताला अटक केले असून, जैनुल असे त्याचे नाव आहे. तो सीलमपूर येथे राहतो आणि भंगार विक्रेता म्हणून काम करतो. तो नांगलोई येथील त्याच्या चुलत भावाच्या घरातून परतत होता आणि सीलमपूरच्या दिशेने जात असताना त्याने मधू लिलोथिया यांच्या कारला बाजूने धडक दिली. त्यानंतर तो घटनास्थळावरून पळून गेला,” असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

चौकशीत कार भरधाव वेगात चालवण्यात आल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “तो नशेत होता की नाही हे तपासण्यासाठी आम्ही वैद्यकीय अहवालाची वाट पाहत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पटेल नगरमधील काँग्रेसचे माजी आमदार राजेश लिलोथिया हे आपल्या कुटुंबासह आनंद पर्वत परिसरात राहतात.

त्यांच्या कुटुंबात मुलगा अरमान, मुलगी आणि पत्नी मधु होते. राजेश सध्या AICC मध्ये राष्ट्रीय अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष आहेत. नातेवाइकांनी पोलिसांना सांगितले की, मधु रोज तिच्या बलेनो कारने बोंटा पार्कला सकाळी फिरायला जात असे.

दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अनिल चौधरी यांनी ट्विट केले की, "दिल्ली काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजेश लिलोथिया जी यांच्या पत्नी श्रीमती मधु लिलोथिया यांचे एका रस्ते अपघातात निधन झाले, हे अतिशय दुःखद आहे. निगमबोध घाटावर त्यांना आदरांजली वाहिली आणि लिलोथिया जी आणि त्यांच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त केल्या. ओम शांती!"

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

Indian Super League: FC Goa च्या कामगिरीवर प्रशिक्षक मार्केझ भडकले; जमशेदपूर विरोधात पराभवाचे कारणही केले स्पष्ट

Eco Green Cement: 'इको ग्रीन सिमेंट' ठरणार बांधकाम क्षेत्रासाठी वरदान; विद्यार्थ्यांचा क्रांतिकारक प्रकल्प

SCROLL FOR NEXT