EX IPS officer Amitabh Gupta Arrested  Dainik Gomantak
देश

योगींच्या विरोधात दंड थोपटलेल्या माजी IPS आधिकाऱ्याला नाट्यमयरित्या अटक

Amitabh Gupta Arrested :पूर्व उत्तर प्रदेशातील 24 वर्षीय महिलेच्या मृत्यूशी संबंधित एका प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

केंद्रीय गृह मंत्रालयाकडून मार्चमध्ये निवृत्त करण्यात आलेले यूपी केडरचे माजी आयपीएस (IPS) अधिकारी अमिताभ ठाकूर (Amitabh Gupta) एका नव्या संकटात सापडले आहेत. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आज यूपी पोलिसांनी त्याला लखनऊमध्ये अटक केली आहे. माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यासह अनेकांनी अमिताभ ठाकूर यांच्या अटकेबद्दल निषेध व्यक्त केला आहे. ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये अमिताभ ठाकूर यांना त्यांच्या लखनऊ येथील निवासस्थानाबाहेरुन जबरदस्तीने पोलिस जीपमध्ये ढकलल्या जात असल्याचे लिहीले आहे. ठाकूर यांनी याला आक्षेप घेत जीपच्या आत बसण्यास नकार देत ‘तुम्ही मला FIR दाखल्याशिवाय मी येणार नाही’ असे म्हणताना दिसता आहेत.

पूर्व उत्तर प्रदेशातील 24 वर्षीय महिलेच्या मृत्यूशी संबंधित एका प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. पीडितेने 2019 मध्ये बसपाचे खासदार अतुल राय यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. पीडित आणि तिच्या पुरुष मित्राने 16 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या गेटबाहेर स्वतःला पेटवून घेतले होते. या आगीमुळे गंभीररित्या भाजलेल्या पीडितेचा काही दिवसांपूर्वी दिल्लीतील रुग्णालयात मृत्यू झाला. मे 2019 मध्ये महिलेने घोसीचे खासदार अतुल राय यांच्याविरोधात वाराणसी येथील त्यांच्या निवासस्थानी बलात्कार केल्याचा आरोप करून गुन्हा दाखल केला होता. अतुल रायने एक महिन्यानंतर आत्मसमर्पण केले आणि तेव्हापासून तो तुरुंगात आहे.

नोव्हेंबर 2020 मध्ये तिच्या भावाने वाराणसीमध्ये महिलेविरोधात बनावट खटला दाखल केला होता. या महिन्याच्या सुरुवातीला, पोलिसांनी बेपत्ता असल्याचे कथितपणे न्यायालयाला सांगितल्यानंतर न्यायालयाने त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले.

त्यानंतर ती महिला आणि तिचा मित्र दिल्लीला गेले आणि त्यांनी स्वतःला आग लावण्यापूर्वी 16 ऑगस्ट रोजी फेसबुक लाईव्ह व्हिडिओ केला. व्हिडिओमध्ये त्याने खासदार आणि त्याच्या नातेवाईकांशी पोलिसांनी संगनमत केल्याचा आरोप केला. त्या महिलेच्या आरोपात कथितपणे पोलीस अधिकाऱ्यांच्या नावांमध्ये अमिताभ ठाकूर यांचे नावही समाविष्ट आहे. या सर्व आधिकाऱ्यांनी महिलेला त्रास दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलेला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Election 2027: निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा 'मास्टरस्ट्रोक'; अधिकाधिक महिलांना उमेदवारी देण्याचा निर्णय, विधानसभेत महिला संख्या वाढवणार

Goa Crime: ऐन सणासुदीत राज्यात घरफोड्या अन् सायबर फसवणुकीचे सत्र! तोरसे, दवर्लीत चोरट्यांचा धुमाकूळ; बँकेला 75 लाखांचा चुना

डिचोली तालुक्यात झेंडूचे मळे केशरी-पिवळ्या फुलांनी बहरले, कृषी खात्याच्या ‘आत्मा’ योजनेला मोठे यश; शेतकऱ्यांच्या मेहनतीला दसऱ्याचे फळ

Asian Para Games 2026: आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंची धमाकेदार सुरुवात! 10 मीटर एअर रायफलमध्ये मोना अग्रवालला 'गोल्ड', तर अवनी लेखराला 'सिल्व्हर'

Goa Mining: 'गाव नष्ट होऊ देणार नाही!' होंडा ग्रामसभेत 'सोलये' खाणीचा प्रश्न ऐरणीवर; एनओसी रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार

SCROLL FOR NEXT