General Bipin Rawat: सीडीएस जनरल बिपीन रावत (CDS General Bipin Rawat) यांनी म्हटले आहे की, देशाच्या सशस्त्र दलांची शस्त्र व्यवस्था (Arms system) आधुनिकीकरणाच्या मार्गावर आहे. त्यांनी शुक्रवारी सांगितले की, राफेल लढाऊ विमान (Rafale fighter Jet), एस - 400 क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली (S - 400 Missile defense system), बीएमडी प्रणाली (BMD System), आकाश शस्त्र प्रणालीच्या (Sky weapon system) अधिग्रहणामुळे आपल्या सशस्त्र दलांची हवाई संरक्षण क्षमता आधुनिकीकरणाच्या मार्गावर आहे. भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी देशाच्या संरक्षण क्षेत्राला आयातीवरील अवलंबित्व संपवावे लागेल. (The country's defense sector needs to end its dependence on imports)
स्वदेशीच संरक्षण प्रणाली विकसित करणे गरजेचे
ते पुढे म्हणाले की देशाचे व्यापक आर्थिक मापदंड आणि सामाजिक - आर्थिक गरजा लक्षात घेऊन आपल्याला स्वदेशी उत्पादनाद्वारे सर्वोत्तम उपाय शोधावे लागतील. जर आपण आपली स्वदेशीच संरक्षण प्रणाली विकसित (To develop indigenous defense system) केली तर आपण सशस्त्र दलांसाठी केलेल्या अर्थसंकल्पीय वाटपाचा अधिक चांगला वापर करू शकू.
भविष्यात युद्धे जिंकण्यासाठी आयातीवर अवलंबून राहू शकत नाही
जनरल बिपीन रावत म्हणाले की, प्रादेशिक शक्ती बनण्याची देशाची आकांक्षा कर्ज घेण्याच्या शक्तीवर अवलंबून राहू शकत नाही. अशा परिस्थितीत भारताच्या संरक्षण आव्हानांना भारतीय पद्धतीने सामोरे जावे लागेल. भविष्यात युद्धे लढायची आणि जिंकायची असतील तर आपण आयातीवर अवलंबून राहू शकत नाही. अशा परिस्थितीत संरक्षण क्षेत्रात स्वदेशीकरण हाच पुढचा मार्ग आहे. ते 5 व्या आयईटीई इनोव्हेटर्स-इंडस्ट्री बैठकीला (5th IETE Innovators-Industry meet) संबोधित करत होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.