Former Andhra Pradesh Chief Minister Kiran Kumar Reddy Joins Dainik Gomantak
देश

Andhra Pradesh: दक्षिणेत काँग्रेसला जोर का झटका! आंध्र प्रदेशच्या माजी मुख्यमंत्र्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Kiran Kumar Reddy Joins: दक्षिण भारतातील आणखी एका राज्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

Manish Jadhav

Former Andhra Pradesh Chief Minister Kiran Kumar Reddy Joins: दक्षिण भारतातील आणखी एका राज्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.

गेल्या महिन्यातच त्यांनी काँग्रेसचा निरोप घेतला होता. रेड्डी हे अविभाजित आंध्र प्रदेशचे शेवटचे मुख्यमंत्री होते. नेतृत्वाशी असलेल्या वादामुळे त्यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

पक्षाला सोडचिठ्ठी देताना रेड्डी म्हणाले की, 'काँग्रेस (Congress) पक्ष जनतेचा कौल समजू शकलेला नाही. काँग्रेस पक्ष ना चूक काय आहे याचे विश्लेषण करत आहे ना त्यांना दुरुस्त करायचे आहे. तो बरोबर आहे आणि देशातील लोकांसह इतर सर्वजण चुकीचे आहेत असे त्याला वाटते. याच विचारसरणीमुळे मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला.'

ते पुढे म्हणाले की, "काँग्रेस हायकमांडच्या चुकीच्या निर्णयांमुळे पक्षाची वाताहत होत आहे, ही एका राज्याची बाब नाही. एक जुनी कहाणी आहे की, माझा राजा खूप हुशार आहे, तो स्वतः विचार करत नाही आणि कोणाच्या सूचना ऐकत नाही. मला काय म्हणायचे आहे ते तुम्हा सर्वांना कळले असेलच.''

दुसरीकडे, रेड्डी हे भाजपच्या (BJP) सर्वोच्च नेतृत्वाच्या संपर्कात असल्याचे बोलले जात होते. तसेच, भाजपने त्यांना पक्षातील महत्त्वाच्या पदाची ऑफर दिल्याचे वृत्त आहे.

आंध्र प्रदेशातील निवडणुका

विशेष म्हणजे, राज्यात विधानसभा निवडणुकीला एक वर्ष बाकी असताना रेड्डी यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या राज्यात मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली वायएसआर काँग्रेसची सत्ता आहे. दक्षिण भारतीय राज्यांमध्ये विस्तार करु पाहणाऱ्या भाजपसाठी रेड्डी यांचा प्रवेश फायदेशीर ठरु शकतो, असे मानले जात आहे.

स्वतःचा पक्ष बनवला

त्याचबरोबर, 2014 साली तेलंगणाची निर्मिती झाल्यानंतर रेड्डी यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्या काळात त्यांनी जय समैक्‍य आंध्र पक्ष हा स्वतःचा पक्ष स्थापन केला होता.

तथापि, 2018 मध्ये ते तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत पक्षात परतले. मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असला तरी मी काँग्रेसपासून फारकत घेऊ शकत नाही, असे ते म्हणाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain Update: गोव्यात पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याकडून ‘यलो अलर्ट’

ED Raid: कर्नाटक ते गोवा, मुंबई, दिल्लीत... ईडीचे छापे, काँग्रेस आमदाराच्या घरातून 1.68 कोटी रोख आणि 6.75 किलो सोने जप्त

Viral Video: रिल्ससाठी कायपण! साडी नेसून पठ्ठ्याने लावले ठुमके, मेट्रोमधील भन्नाट डान्स व्हायरल; नेटकऱ्यांनी संताप व्यक्त करत घेतली शाळा

IND vs WI: स्वातंत्र्य दिनी किंग कोहलीचा धमाका! वेस्ट इंडिजविरुद्ध ठोकलं दमदार शतक; टीम इंडियासाठी '15 ऑगस्ट' लय खास

Cricketer Death: क्रिडाविश्वात खळबळ, 138 विकेट्स आणि 2000+ धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूचं निधन

SCROLL FOR NEXT