Fly91 Dainik Gomantak
देश

Fly91: भारतीय लष्कराच्या शौर्याला फ्लाय 91चा सलाम! जवान अन् त्यांच्या कुटुंबीयांसाठी केली 'ही' मोठी घोषणा

Fly91 Ticket Offer For Indian Soldiers: भारतीय लष्कराच्या शौर्याला मानवंदना म्हणून फ्लाय91 या प्रादेशिक विमानसेवेने एक मोठी घोषणा केली. भारतीय लष्करातील जवान तसेच त्यांचे जवळचे कुटुंबीय यांना फ्लाय 91 च्या तिकिटांच्या मूळ दरावर 50 टक्के सवलत दिली जाणार आहे.

Manish Jadhav

पणजी: भारतीय लष्कराच्या शौर्याला मानवंदना म्हणून फ्लाय91 या प्रादेशिक विमानसेवेने एक मोठी घोषणा केली. भारतीय लष्करातील जवान तसेच त्यांचे जवळचे कुटुंबीय यांना फ्लाय 91 च्या तिकिटांच्या मूळ दरावर 50 टक्के सवलत दिली जाणार आहे. देशसेवेत मोलाचे योगदान देणाऱ्या या वीर जवानांच्या सन्मानार्थ ही सवलत जाहीर करण्यात आली असून, विशेष आसन राखीव ठेवणे आणि अतिरिक्त सामान वाहतूक सवलतही देण्यात येणार असल्याची माहिती फ्लाय91 ने दिली आहे.

'पहिले येणाऱ्यास प्राधान्य'

दरम्यान, ही सवलत फ्लाय91च्या सर्व उड्डाणांसाठी लागू असून 'पहिले येणाऱ्यास प्राधान्य' या तत्त्वावर उपलब्ध आहे. प्रवासादरम्यान, लष्करी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 किलो अतिरिक्त चेक-इन सामानाची सवलतही दिली जाईल. फ्लाय91 कडून ही योजना भारतीय लष्कराच्या शौर्य, निस्वार्थ सेवा आणि कर्तव्यभावनेला वाहिलेली एक कृतज्ञतेची मानवंदना असल्याचे सांगण्यात आले.

राष्ट्रसेवेसाठी फ्लाय91 कटिबद्ध

“राष्ट्रसेवेच्या कार्यात मदत करण्यासाठी फ्लाय91 नेहमीच कटिबद्ध आहे. संरक्षण मंत्रालयाच्या सहकार्याने लष्करातील जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी ही सवलत देताना आम्हाला अत्यंत अभिमान वाटतो,” असे फ्लाय91 चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चाको यांनी सांगितले.

जबाबदार भारतीय प्रादेशिक विमान सेवा

“एक जबाबदार भारतीय प्रादेशिक विमान सेवा म्हणून, देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या शूर जवानांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे आम्ही आमचे आद्य कर्तव्य मानतो. दिली जाणारी ही सवलत आमच्या कृतज्ञतेचे मनःपूर्वक आणि नम्रतेने अर्पण केलेले एक छोटेसे प्रतीक आहे.” असेही ते पुढे म्हणाले.

टियर 2 आणि टियर 3 शहरांना हवाई मार्गाने जोडणे

तसेच, या सुविधेचा लाभ घेण्यासाठी पात्र जवानांना support@fly91.in या ई-मेलवर संपर्क साधावा लागेल. फ्लाय91 भारतातील (India) टियर 2 आणि टियर 3 शहरांना हवाई मार्गाने जोडण्यावर लक्ष केंद्रित करत असून देशातील शेवटच्या टप्प्यापर्यंत हवाई सेवा पुरवण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या फ्लाय91 गोवा, हैदराबाद, पुणे, जळगाव, सिंधुदुर्ग आणि लक्षद्वीपमधील अगत्ती या ठिकाणी सेवा पुरवते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Navi Mumbai Airport: नवी मुंबईला मिळाली जागतिक ओळख, नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन; पाहा खास Photos Videos

लेट नाईट ऑपरेशन! कोलवा येथे मसाज पार्लरमधून नऊ मुलींची सुटका; पोलिस, अर्ज यांची संयुक्त कारवाई

GDS Recruitment: 'कोकणी भाषा येते?' गोंयकारांसाठी उघडलंय रोजगाराचं दार, पोस्टात काम करण्याची संधी; वाचा माहिती

Goa Nestle Case : नेस्लेला मोठा दिलासा! 300 कोटींच्या तक्रारीवर पडदा; "मॅगी सॉस घोटाळा" CCI ने फेटाळला

Pakistan Terror Attack: पाकिस्तानी लष्करावर मोठा दहशतवादी हल्ला, लेफ्टनंट कर्नल, मेजरसह 11 ठार; 'या' दहशतवादी गटाने घेतली हल्ल्याची जबाबदारी

SCROLL FOR NEXT