Air India Flight Dainik Gomantak
देश

Air India Flight : दिल्लीहून सॅन फ्रान्सिस्कोला जाणाऱ्या विमानामध्ये बिघाड, रशियामध्ये इमर्जेन्सी लँडिंग

Ashutosh Masgaunde

Air India Flight Emergency Landing

 इंजिनमध्ये बिघाड झाल्याने दिल्लीहून सॅन फ्रान्सिस्कोला जाणारे एअर इंडियाचे विमान मंगळवारी (6 जून) रशियातील मगदानच्या दिशेने वळवण्यात आले.

एअर इंडियाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, विमानाचे रशियामध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. विमानातील सर्व 216 प्रवासी आणि 16 क्रू मेंबर्स सुरक्षित आहेत.

एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, दिल्लीहून सॅन फ्रान्सिस्कोला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमान AI173 च्या एका इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. 216 प्रवासी आणि 16 कर्मचारी असलेले विमान वळवण्यात आले आणि रशियातील मगदान विमानतळावर सुरक्षितपणे उतरवण्यात आले.

विमानाची तपासणी

प्रवाशांना सर्वतोपरी मदत केली जात असून लवकरात लवकर त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचण्यासाठी पर्याय उपलब्ध करून दिला जाईल, असे ते म्हणाले. विमानाचे अनिवार्य ग्राउंड चेकिंग सुरू आहे. अलीकडे, फ्लाइटमधील बिघाडाच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

प्रवाशांना सुविधा

एअर इंडियाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, मगदान विमानतळावर प्रवाशांना सर्व मदत केली जात आहे आणि लवकरात लवकर त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचण्यासाठी पर्यायी पर्याय उपलब्ध करून दिले जातील. लँडिंग केल्यानंतर विमानाची तपासणी केली जात आहे.

इंडिगो फ्लाइटमध्येही बिघाड

दोन दिवसांपूर्वी तांत्रिक समस्येमुळे दिब्रुगडला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाचे गुवाहाटी येथील लोकप्रिय गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. केंद्रीय मंत्री रामेश्वर तेली यांच्यासह अनेक आमदारही या विमानात होते.

 इंडिगोने या घटनेसंदर्भात एक निवेदन जारी केले होते की, वैमानिकाने विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याचे जाहीर केल्यानंतर फ्लाइटचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमानात केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री रामेश्वर तेली आणि भाजपचे दोन आमदार प्रशांत फुकन आणि तेराश गोवाला यांच्यासह 150 प्रवासी होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोवा राजभाषा कायद्यात मराठी नको म्हणाणाऱ्या दामोदर मावजो यांची अभिजात दर्जानंतर पहिली प्रतिक्रिया; स्पृश्य - अस्पृश्यतेचा केला उल्लेख

Sand Mining: गोव्यात बांधकामांना आता 'अच्छे दिन' 'मांडवी', 'झुआरी'त रेती उपशास मुभा; दरावरही येणार नियंत्रण

कोने, प्रियोळ येथे भीषण अपघातात एक ठार; दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी 4 अपघात, गोव्यातील ठळक बातम्या

Goa News: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्प्रिंगबोर्ड टॅबलेटचे वाटप

सुभाष वेलिंगकरांना अटक होणार का? गोव्यात कॅथलिक समाज आक्रमक, पोलिस स्थानकांवर निदर्शने

SCROLL FOR NEXT