गंगा आणि गंगेतील तरंगते मृतदेह यामूळे उत्तरप्रदेशसह संपुर्ण देशात कोरोना फैलाव अतिउच्च शिखरावर असताना हा विषय देशभर चर्चेत आला होता. यानंतर मात्र गंगेत मृत आढळल्याचं कधीही समोर आले नाही. मात्र आज बिहारच्या नाथ बाबा घाटावरील स्थितीवरुन मिळालेल्या माहितीनुसार पुन्हा एकदा गंगा किनाऱ्यावर मृतदेह आढळल्याची बाब समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार गंगा नदीच्या किनारी गुरुवारी सकाळी एकाच वेळी पाच जणांचे आढळल्यानं खळबळ उडाली असून पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. (Five bodies found on the banks of the Ganges)
बिहारच्या बक्सर जिल्ह्यात गंगा नदीच्या किनारी हे पाच अज्ञान व्यक्तींचे मृतदेह आढळले. तर एकाच वेळी इतके मृतदेह नाथ बाबा घाटावर आढळल्याची माहिती स्थानिक पोलिसांना मिळाल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, बिहारच्या बक्सर जिल्ह्यात गंगा नदीच्या किनारी असलेल्या नाथ बाबा घाटावर पाच मृतदेह आढळले. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.
या घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली असून लोकांनी नदी किनारी गर्दी केली आहे. मृत व्यक्तींपैकी एक महिला असून इतर चार पुरुष आहेत. हे मृतदेह कुठून आले याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. कोरोना काळात गंगा नदीच्या किनारी मृतदेहावरून गेल्या वर्षी बरीच चर्चा झाली होती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत १० मे २०२१ रोजी एकाचवेळी चौसा प्रखंड इथल्या महादेव घाटावर अनेक मृतदेह तरंगताना आढळले होते. त्यावरून कोरोना मृतांची संख्या लपवल्याचे आरोपही केले गेले होते. गंगा नदीत वाढलेल्या मृतदेहावरून भाजपवर विरोधी पक्षाने जोरदार टीका केली होती.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.