''भाजप प्रचारात हिरो...'': गुलाम नबी आझाद

कॉंग्रेस नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी भाजपवर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला आहे.
Ghulam Nabi Azad
Ghulam Nabi AzadDainik Gomantak
Published on
Updated on

देशातील राजकारण मागील काही दिवसांपासून लाऊडस्पीकर आणि हनुमान चालिसा भोवती फेर धरत असतानाच कॉंग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी भाजपवर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी बुधवारी म्हटले की, ''भाजप सरकार प्रचारात हिरो आहे, तर कॉंग्रेस आणि कॉंग्रेस नेतृत्वाखालील सरकार त्या आघाडीवर "शून्य" ठरत आहेत. कॉंग्रेस (Congress) प्रचार तंत्रामध्ये अपयशी ठरत आहे.'' आझाद पुढे म्हणाले की, 'प्रचाराच्या पातळीवर आपण पूर्णपणे शून्य होतो.' गुलाम नबी आझाद हे काँग्रेसच्या G-23 नेत्यांपैकी एक आहेत. पक्षाच्या नेतृत्व बदलासाठी या नेत्यांनी आवाज उठवला आहे. या नेत्यांमध्ये कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांचाही समावेश आहे. (Ghulam Nabi Azad said the BJP is a hero in the campaign while the Congress is zero on that front)

दरम्यान, व्यासपीठावर उपस्थित असलेले भाजप नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेऊन आझाद म्हणाले, "त्यांचे सरकार प्रचारात हिरो आहे, पण आम्ही प्रचारात शून्य होतो... पूर्णपणे शून्य... मी स्वतःचे कौतुक करतो आणि आम्ही जे केले ते जाहीर न केल्याबद्दल मी स्वतःला, माझ्या सरकारला आणि माझ्या पक्षाला दोष देतो.''

Ghulam Nabi Azad
प्रशांत किशोर यांनी लालू-नितीश यांच्यावर साधला निशाणा

तसेच, नागपुरात 'लोकमत टाइम्स एक्सलन्स इन हेल्थकेअर अवॉर्ड्स 2021' कार्यक्रमात आझाद बोलत होते. आझाद पुढे म्हणाले की, ''निवडून आलेला प्रतिनिधी म्हणून माझा 42 वर्षांचा कार्यकाळ, तत्कालीन जम्मू आणि काश्मीर राज्याचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय आरोग्य मंत्री म्हणून काम केल्याचे ‘समाधान’ आहे. त्या काळात आम्ही लोकांसाठी अनेक नवनवीन उपक्रम सुरु केले आणि अनेक नवीन कल्याणकारी योजनाही राबवल्या.''

याशिवाय, आझाद यांनी आठवण करुन दिली की, ''जेव्हा मला केंद्रीय मंत्री बनवण्यात आले तेव्हा, तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना आरोग्य मंत्रालय देण्याची मागणी केली होती. यावर सिंह म्हणाले होते की, तुमच्यासारख्या अनुभवी नेत्यासाठी हे मंत्रिपद खूपच लहान आहे. "तथापि, मी नशीबवान होतो कारण मला आरोग्य मंत्री करण्यात आले. मला देशासाठी काहीतरी करायचे आहे, आरोग्य क्षेत्रात काम करायचे आहे आणि माझ्या कल्पना अंमलात आणायच्या आहेत, असे मी तत्कालीन पंतप्रधानांना सांगितले होते.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com