Himachal Election 2022 Dainik Gomantak
देश

Himachal Election 2022: हिमाचल प्रदेशात मतदासानासाठी प्रथमच क्युआर कोडचा वापर; पहिल्या 3 तासात 10 टक्के मतदान

68 जागांवर 412 उमेदवार रिंगणात; भाजप, काँग्रेस, 'आप'मध्ये लढत

गोमन्तक डिजिटल टीम

Himachal Election 2022: हिमाचल प्रदेशच्या सर्व 68 विधानसभा मतदारसंघात आज, शनिवारी सकाळी 8 पासून मतदानाला सुरवात झाली. राज्यात विधानसभेच्या एकुण 68 जागा असून यंदा 412 उमेदवार रिंगणात आहेत. तर राज्यात 55 लाख 92 हजार 882 मतदार आहेत.

दरम्यान, बोगस मतदान रोखण्यासाठी निवडणूक आयोग सतर्क असून मतदानाचे रियल टाईम मॉनिटरिंग केले जात आहे. पहिल्यांदाच क्युआर कोडद्वारे मतदारांची ओळख पटवली जात आहे. राज्यातील कांगडा, शिमला, मंडी आणि हमीरपुर येथील प्रत्येकी एका मतदारसंघात ही प्रक्रिया राबवली जात आहे. मतदार मतदानासाठी गेल्यावर अधिकार अॅपच्या माध्यमातून त्याची मतदान स्लिप स्कॅन करतील. बोगस मतदान टाळण्यासाठी आणि निवडणुकीतील इतर अवैध प्रकार टाळण्यासाठी निवडणूक आयोगाने यासाठी पुढाकार घेतला आहे.

कडाक्याच्या थंडीतही लोक मतदानासाठी बाहेर पडले आहेत. पहिल्या तीन तासांतच जवळपास 10 टक्के मतदान पार पडले आहे. राज्यात 28 लाख 54 हजार 945 पुरुष मतदार तर 27 लाख 37 हजार 845 महिला मतदार आहेत. याशिवाय 38 थर्ड जेंडर मतदार आहेत. याशिवाय 67 हजार 559 सर्व्हिस मतदार, 56 हजार 501 दिव्यांग आणि 22 एनआरआय मतदार आहेत.

सायंकाळी 5 पर्यंत मतदान असणार आहे. राज्यात 7,881 मतदान केंद्रांवर मतदान होत आहे. यावेळी निवडणुकीच्या रिंगणात भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पक्षदेखील उतरला आहे.

आत्तापर्यंत मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी त्यांच्या कुटूंबासह मतदान केले आहे. ठाकुर यांनी भाजपच पुन्हा सत्तेत येण्याचा विश्वास व्यक्त केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष प्रतिभा सिंह यांनीही कुटुंबासह मतदान केले. यावेळी त्यांनी राज्यात काँग्रसचे सरकार येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विरोधी पक्षनेते मुकेश अग्निहोत्री यांनीही मतदानाचा हक्क बजावला. राज्यात मतदानाच्या पार्श्वभुमीवर सीआरपीएफच्या 67 तुकड्या आणि 11,500 पोलिस तैनात केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT