Biplab Kumar Dev  Dainik Gomantak
देश

Tripura Election 2023: त्रिपुरात भाजपचे 48 उमेदवार जाहीर; माजी मुख्यमंत्र्यांचे तिकीट कापले...

काँग्रेसच्या पहिल्या यादीत 17 उमेदवार; 16 फेब्रुवारी रोजी मतदान

Akshay Nirmale

Tripura Election 2023: भाजपने त्रिपुरा विधानसभा निवडणुकीसाठी त्यांच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत 48 विधानसभा जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

या यादीमुळे माजी मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब निवडणूक रिंगणातून बाहेर राहतील, या शक्यतेला बळकटी मिळाली आहे कारण त्यांचे नाव या यादीत नाही. देव यांच्या बनमालीपूर मतदारसंघातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष राजीव भट्टाचार्य यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

सीएम माणिक साहा यांना बोरदोवली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. या यादीत केंद्रीय मंत्री प्रतिमा भौमिक यांच्या नावाचाही समावेश आहे. त्यांना धानपूर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

दोन मुस्लिम उमेदवार

भाजपच्या पहिल्या यादीत दोन मुस्लिम उमेदवारांचाही समावेश आहे. तफजल हुसेन यांना बॉक्सनगरमधून तिकीट दिले आहे तर कैलाशहरमधून मोहम्मद मोबेशर अली यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

दरम्यान, काँग्रेसने पहिल्या यादीत 17 उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यात आगरताळातून सुदीप रॉय बर्मन यांना तिकीट दिले आहे.

16 फेब्रुवारी रोजी मतदान

निवडणूक आयोगाने 18 जानेवारी रोजी त्रिपुरामध्ये 60 जागांसाठी विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर केली होती. राज्यात फेब्रुवारीला मतदान होणार आहे. 2 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. त्रिपुरा विधानसभेचा कार्यकाळ 22 मार्च रोजी संपत आहे. त्रिपुरा निवडणुकीसाठी 21 जानेवारी रोजी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. नामांकनाची अंतिम तारीख 30 जानेवारी आहे. 2 फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

The Sabarmati Report: गोध्रा अग्निकांडावर बेतलेला 'द साबरमती रिपोर्ट' गोव्यात टॅक्स फ्री; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Cash For Job Scam: गोमंतकीयांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या विषया आणि सोनियाला जामीन मंजूर; मडगाव कोर्टाचा निर्णय

Krittika Nakshatra: गोव्यात कृत्तिका पूजन का करतात? जाणून घ्या धार्मिक महत्व आणि फायदे

युथ काँग्रेसची म्हार्दोळ पोलिस ठाण्यावर धडक, Cash For Job प्रकरणी आक्रमक; मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी!

SCROLL FOR NEXT