Diwali Fire Dainik Gomantak
देश

Kashmir पासून ते बंगालपर्यंत दिवाळीत आगीने केला कहर

Diwali Fire: दुकाने, गोदामे, घरे, मशिदींना आग लागली.

दैनिक गोमन्तक

दिवाळीच्या  (Diwali) मुहूर्तावर काश्मीरपासून बंगालपर्यंत आगीचा कहर पाहायला मिळत आहे. जम्मू आणि काश्मीरमधील अनेक भागात आग लागल्याचे वृत्त असताना, बुधवार, 25 ऑक्टोबर 2022 रोजी बंगालमधील हावडा येथील एका गोदामात आग लागली. प्लास्टिकच्या गोदामात ही आग लागली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग आटोक्यात आणली.

हावडा येथील गोलाबारी पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या रोज मेरीलेन भागातील एका गोदामाला मंगळवारी पहाटे आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. यानंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मिळालेल्या माहितीनुसार, लोक मॉर्निंग वॉकसाठी (Morning Walk) बाहेर पडले असताना गोदामातून ज्वाळा निघत असल्याचे पाहून अग्निशमन दल आणि पोलिसांना तत्काळ घटनेची माहिती देण्यात आली, त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले.

श्रीनगरमधील जामिया मशिदीला आग

 तर, काल रात्री श्रीनगरच्या नोहट्टा भागात मोठी आग लागली. नोहट्टा येथील जामा मशिदीनंतर अनेक गोदामे आणि निवासी इमारती जळून खाक झाल्या आहेत. या भागातील बहुतांश घरे लाकडाची असल्याने आग झपाट्याने पसरत आहे. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी आग विझवण्याचे प्रयत्न करत आहेत. दिवाळीच्या रात्री जम्मू जिल्ह्यात आगीच्या एकूण 22 घटना घडल्या. तर जम्मू विभागात 35 घटनांची नोंद झाली आहे.

दिवाळीतही दिल्लीत आगीच्या घटना घडतात

दिल्लीत कुठे घरात तर कुठे दुकानांना आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीच्या (Diwali) रात्री आग लागल्याचे 201 कॉल्स आले होते. दिवाळीच्या संध्याकाळी 4 ते 6 च्या दरम्यान अग्निशमन दलाला आग लागल्याचे 42 फोन आले . 7 ते 8 वाजेदरम्यान 13 कॉल्स आले, तर 8 ते 9 वाजेदरम्यान 30, 9 ते 10 वाजेदरम्यान 22 फोन आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope April 2026: 30 एप्रिलपर्यंत 'नो रिस्क'! ग्रहांची बदलली चाल, मेष राशीचं वाढलं टेन्शन; चुकीच्या निर्णयामुळे अडकू शकता संकटाच्या चक्रव्यूहात

GCA Premier League: धेंपो क्लबची अर्धी मोहीम फत्ते, 'चौगुले'विरुद्ध 646 धावांचा डोंगर; स्नेहलचे द्विशतक, जीवनचे शतक

VIDEO: वैमानिकाची एक चूक अन् 8 प्रवाशांचा खेळ खल्लास, 5 मिनिटांतच होत्याचं नव्हतं झालं; इंडोनेशियातील बोर्नियो बेटावर हेलिकॉप्टर क्रॅश

Watch Video: अय्यरच्या 'सुपरमॅन' अवतारावर रोहित-सूर्याचे विस्फारले डोळे, चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला; श्रेयसचा धडाकेबाज कॅच व्हायरल

Omkar Elephant: 'ओंकार'चा उगवे भागात धुमाकूळ, संतप्त नागरिकांकडून सरकारविरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा

SCROLL FOR NEXT