पश्चिम बंगालमधील पूर्वा मेदिनीपूर जिल्ह्यातील हल्दिया येथील इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC) रिफायनरीला मंगळवारी दुपारी आग लागली. यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 44 जण जखमी झाले आहेत.
रिफायनरीच्या एका युनिटमध्ये ही घटना घडल्याचे आयओसीने आपल्या निवेदनात म्हटले आहे. त्यानंतर तेथे काम सुरू होते. इंधनात अचानक लागलेली आग हे या घटनेचे कारण असू शकते, असे निवेदनात म्हटले आहे. या आगीमुळे भाजलेल्यांपैकी तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर 44 जण गंभीर जखमी झाले.
आग आटोक्यात आली असून परिस्थिती आता नियंत्रणात असल्याचे इंडियन ऑईलने म्हटले आहे. जखमी झालेल्या 44 जणांपैकी 37 जणांना कोलकाता येथील रुग्णालयात (Hospital) पाठवण्यात आले आहे. यापैकी सात जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनीही या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट केले की, “इंडियन ऑईल कॉर्पोरेशनमध्ये लागलेल्या आगीच्या घटनेबद्दल ऐकून खूप दुःख झाले. या अपघातात जखमी झालेल्यांना ग्रीन कॉरिडॉरद्वारे कलकत्त्याला आणण्यात येणार आहे. त्यांच्या उपचारासाठी सरकार आवश्यक ती सर्व मदत करेल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.