'सरकार माझ्या मुलांना टार्गेट करतयं': प्रियांका गांधी

" सरकार माझ्या मुलांचे (Children) इंस्टाग्राम अकाउंट हॅक करत आहे.''
Priyanka Gandhi

Priyanka Gandhi

Dainik Gomantak

Published on
Updated on

देशात आगामी काळात पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. याच पाश्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कबंर कसली आहे. यातच राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडू लागले आहेत. उत्तरप्रदेश राज्याच्या प्रभारी आणि कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. त्या यावेळी म्हणाल्या, माझ्या मुलांचे इन्स्टाग्राम अकाउंटही हॅक केले जात आहेत. राजकीय विरोधकांच्या घरांवर आयकर विभागाचे छापे आणि बेकायदेशीर फोन टॅपिंगबाबत प्रश्न विचारला असता काँग्रेस सरचिटणीसांनी हे आरोप केले. प्रियांका गांधी पुढे म्हणाल्या, सरकार सोशल मीडियावर (Social media) माझ्या मुलांना टार्गेट करत आहे. त्या पुढे म्हणाला, "माझ्या मुलांचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक होत आहेत. फोन टॅपिंग पुरेसे नाही. त्यांना काम नाही का?"

<div class="paragraphs"><p>Priyanka Gandhi</p></div>
तृणमूल काँग्रेस खासदार डेरेक ओब्रायन संसदेच्या उर्वरित सत्रासाठी निलंबित

दरम्यान, प्रियंका गांधी यांना दोन मुले आहेत. त्यांना 18 वर्षांची मुलगी मिराया वड्रा आणि 20 वर्षांचा मुलगा रेहान वाड्रा आहे. प्रियांका गांधी सध्या यूपी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये व्यस्त आहेत. उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) प्रभारी म्हणून प्रियंका गांधी यांच्यावर देशातील सर्वात मोठ्या राज्यात पक्षाला बळकटी देण्यासाठी मोठी जबाबदारी आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीत पक्षाची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली आहे.

निवडणुकीपूर्वी महिलांपर्यंत पोहोचण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रयत्नावरही प्रियांका गांधी यांनी हल्ला चढवला. पीएम मोदींनी महिलांबाबत याआधी घोषणा का केल्या नाहीत, असा सवालही प्रियांका यांनी उपस्थित केला. गेल्या पाच वर्षांत त्यांनी ही घोषणा का केली नाही? 'लडकी हूं, लड सकती हूं' या घोषणेने महिला आता जागरुक झाल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com