Saharanpur Delhi train Twitter
देश

प्रवाशांनी रेल्वेला धक्का मारत मोठा अनर्थ टाळला; व्हिडिओ व्हायरल

मेरठमध्ये 'द बर्निंग ट्रेन', इंजिनसह दोन डब्बे जळून खाक

दैनिक गोमन्तक

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मेरठजवळील (Meerut) दौराला रेल्वे स्थानकावर सहारनपूर - दिल्ली ट्रेनच्या (Saharanpur Delhi train) इंजिन आणि दोन डब्यांना आग लागली. उरलेले इंजिन आणि दोन डबे वेगळे करण्याच्या प्रयत्नात प्रवाशांनी ट्रेन बाजूला ढकलली. त्यामुळे ट्रेनचे उर्वरित डबे आगीच्या विळख्यात येण्यापासून बचावले. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेनच्या पॅसेंजर डब्यात स्फोट झाल्यानंतर धूर निघू लागला. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोचमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती. सुदैवाने रेल्वे स्टेशनवर ट्रेन उभी असतानाही घटना घडली होती. ट्रेन दारौला स्टेशनवर सकाळी 7.10 वाजता पोहोचली होती.

डब्याला आग लागताच प्रवासी बाहेर पडू लागले. आग पूर्णपणे कोचमध्ये पसरली होती. आग लागल्यानंतर प्रवाशांनी उर्वरित डबे वाचवण्यासाठी ट्रेन पुढे ढकलली. प्रवाशांनी स्वत: ट्रेनचे इतर डबे स्थानकाच्या दिशेने ढकलले, असे या ह्विडिओमध्ये दिसत आहे.

सहारनपूर-दिल्ली पॅसेंजरमध्ये दौराला रेल्वे स्थानकावर आग लागल्याने दिल्ली-मेरठ रेल्वे मार्गावरही परिणाम झाला. सकाळी अनेक महत्त्वाच्या गाड्या मेरठमार्गे डेहराडून आणि दिल्लीला जातात. दिल्ली ते डेहराडून दरम्यान धावणारी सर्वात महत्वाची ट्रेन शताब्दी एक्स्प्रेस आहे. अपघातामुळे शताब्दी मेरठ सिटी स्टेशनवर थांबवण्यात आली. याशिवाय जम्मूहून मेरठमार्गे दिल्लीला जाणारी शालीमार एक्स्प्रेस सकौती स्थानकावर थांबवण्यात आली आहे. दुसरीकडे, मेरठहून प्रयागराजहून सहारनपूरला जाणारी नौचंडी एक्स्प्रेसही सिटी स्टेशनवरच थांबवण्यात आली. मुझफ्फरनगर खतौली स्थानकावरही अनेक गाड्या थांबवण्यात आल्या होत्या. याप्रकरणी डीआरएम मेरठ, डिम्पी गर्ग यांनी सांगितले की, ही ट्रेन सहारनपूरहून येत होती, जेव्हा ट्रेनला आग लागली तेव्हा पहिला डबा वेगळा करण्यात आला आणि प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. या घटनेच्या तपासासाठी एसईजी समिती स्थापन करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourism: 500 वर्षांपूर्वीचे दगड, पोर्तुगीज कालीन किल्ला, गर्दीपासून दूर 'या' गावाने जपलेय 'पारंपरिक पर्यटन'

IND vs AUS 1st T20: ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला टी-20 सामना रद्द! पुन्हा एकदा पाऊस ठरला व्हिलन; फॉर्ममध्ये परतला कर्णधार 'सूर्या'

दक्षिण गोवा पोलिस अधीक्षकांची चौकशी करा, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी मडगावच्या PSI विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

IND vs AUS 1st T20: सर्वात जलद 150 षटकार...! कर्णधार सूर्यकुमार यादवचं धूमशान, तूफानी षटकार ठोकत रोहित शर्माला सोडले मागे; व्हिडिओ पाहून व्हाल थक्क

India President: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी 'राफेल'मधून घेतली भरारी, पाकड्यांच्या दाव्याचीही पोलखोल; म्हणाल्या, 'हा माझ्यासाठी अविस्मरणीय अनुभव...' VIDEO

SCROLL FOR NEXT