Union Finance Minister Nirmala Sitharaman Dainik Gomantak
देश

लखीमपूर खेरी प्रकरणाचा निषेध करत अर्थमंत्र्यांनी विरोधकांवर साधला निशाणा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Union Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी लखीमपूर खेरी हिंसाचाराला "निंदनीय" असे म्हटले आहे.

दैनिक गोमन्तक

मागील काही दिवसांपासून लखीमपूर खेरी (Lakhimpur Kheri) प्रकरणावरुन योगी आणि मोदी सरकारवर देशातील विरोधी पक्षांनी निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. यातच आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Union Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी लखीमपूर खेरी हिंसाचाराला "निंदनीय" असे म्हटले आहे. यासोबतच त्यांनी विरोधकांवरही या मुद्द्यावरुन राजकारण करत असल्याचा आरोप केला. त्या म्हणाल्या की, भारताच्या इतर भागातही अशाच जेव्हा घटना घडतात, तेव्हा विरोधकांना त्या घटना दिसत नाहीत का? असा सवाल उपस्थित त्यांनी यावेळी उपस्थित केला. अमेरिकेच्या (America) अधिकृत दौऱ्यावर असलेल्या सीतारामन यांनी हार्वर्ड केनेडी शाळेत लखीमपूर खेरी येथील चार शेतकऱ्यांचा मृत्यू आणि केंद्रीय राज्यमंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्रा यांच्या अटकेबद्दल वार्तालापा दरम्यान विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना हे वक्तव्य केले.

यावेळी त्यांना विचारण्यात आले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वरिष्ठ मंत्र्यांकडून अद्याप या घटनेवर कोणत्याही प्रकारचे भाष्य करण्यात आलेले नसून जेव्हा कोणी अशा गोष्टींबद्दल विचारतो तेव्हा नेहमीच 'बचावात्मक प्रतिसाद' का? यावर त्या म्हणाल्या, 'नाही, ते अजिबात नाही ... त्याचप्रमाणे इतर ठिकाणी घडणाऱ्या घटना माझ्यासाठी चिंतेचे कारण आहेत.

सीतारामन म्हणाल्या, 'भारतातील अशी प्रकरणे देशाच्या विविध भागांमध्ये समान प्रमाणात घडत आहेत. मला आणि भारताला माहीत असलेले डॉ.अमर्त्य सेन यांच्यासह इतर अनेकांनी प्रत्येक वेळी अशी घटना घडली की मते मांडली पाहिजे. अशा प्रकारच्या घटनेवर केवळ तेव्हाच प्रश्न उपस्थित केले जाऊ नयेत, जेव्हा आपल्यासाठी ते अनुकूल असेल. कारण हे प्रकरण अशा राज्यात घडले जेथे भाजप सत्तेत आहे, ज्यामध्ये माझ्या मंत्रिमंडळातील एका सहकाऱ्याचा मुलगा कदाचित अडचणीत आहे.

या घटनेचा संपूर्ण तपास होणार

त्या पुढे म्हणाल्या की, या घटनेमागे कोण आहे याचा शोध घेण्यासाठी संपूर्ण तपास केला जाईल. "आणि हे माझ्या पक्षाच्या बचावाबद्दल आहे म्हणून नाही. हे भारताच्या संरक्षणाबाबत आहे. मी भारतासाठी बोलेन, मी गरिबांना न्याय देण्याविषयी बोलेन.

3 ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या दौऱ्याचा निषेध करणाऱ्या चार शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या वाहनांपैकी एकामध्ये केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा असल्याचा आरोप आहे. या आरोपांनंतर आशिषचे नाव एफआयआरमध्ये नोंदवण्यात आले.

शेतकऱ्यांच्या आंदोलनावरील एका प्रश्नाला उत्तर देताना सीतारामन म्हणाल्या की, सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांवर विविध संसदीय समित्यांनी अनेकवेळा चर्चा केली. 2014 मध्ये भाजप सत्तेवर आल्यानंतर या तीन कायद्यांवर केंद्र सरकारकडून राज्य सरकारांनी स्वतंत्रपणे चर्चा केली असून प्रत्येक भागधारकांशी सल्लामसलत केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

School Discipline: कच्च्या मडक्यांना योग्य वळण देणारी शाळेची शिकवण; विद्यार्थी आणि शिक्षकांची अविस्मरणीय गाथा

रुद्रेश्वरासमोर दामू नाईकांचे 'मिशन 27'! प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस, भाजपने केला निवडणुकीचा श्रीगणेशा

Opinion: शिक्षण, संशोधन आणि कौशल्यविकासाच्या संगमातून भारताचा दबदबा; 'विक्रम' चिप ठरते स्वदेशी सामर्थ्याचे प्रतीक

BITS Pilani: 'बिट्स पिलानीतील मृत्यूंची चौकशी करा, न्यायालयीन आयोग नेमावा', प्रतीक्षा खलप यांची मागणी

Asia Cup 2025: अर्शदीप सिंह रचणार इतिहास! आशिया कपमध्ये ठोकणार 'शतक'; अशी कामगिरी करणारा ठरणार पहिलाच भारतीय

SCROLL FOR NEXT