boiling oil Dainik Gomantak
देश

दोघांमधील भांडण विकोपाला गेले, पत्नीने रागाच्या भरात पतीच्या अंगावर कढईतील उकळते तेल ओतले

Belgaum Crime News: पती सुभाष आणि पत्नी वैशाली यांच्या वारंवार वाद होत असे. यामुळे दोघांनी एकमेकांसोबत अबोला धरला होता.

गोमंतक ऑनलाईन टीम

बेळगाव: पती – पत्नीमधील भांडण विकोपाला गेल्यानंतर रागावलेल्या पत्नीने चक्क कढईतील उकळते तेल पतीच्या अंगावर ओतले. बेळगावमधील मच्छे गावात सोमवारी (०६ ऑक्टोबर) दुपारच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये पती ४० भाजल्याची माहिती समोर आली असून, पत्नीविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सुभाष हणमंतगौडा पाटील (५५, रामनगर, मच्छे, बेळगाव) असे तेलाने भाजलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी त्याची पत्नी वैशाली सुभाष पाटील (४०) हिच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सुभाष उकळत्या तेलाने ४० टक्के भाजल्याची माहिती समोर आली असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या अधिकच्या माहितीनुसार, पती सुभाष आणि पत्नी वैशाली यांच्या वारंवार वाद होत असे. यामुळे दोघांनी एकमेकांसोबत अबोला धरला होता. सोमवारी दोघांमध्ये पुन्हा भांडण झाले. यावेळी पत्नी वैशाली स्वयंपाकघरात काम करत होती. शेगडीवर कढईत उकळते तेल होते. 

भांडण एवढे वाढले की पत्नीला राग अनावर झाला आणि कढईत उकळत असणारे तेल तिने पतीच्या अंगावर फेकले. उकळत्या तेलामुळे पती गंभीरपणे भाजला आहे. उपचारासाठी त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी पत्नीविरोधात खुनाच्या प्रयत्नाखाली गुन्हा नोंद केला असून, अधिक तपास केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Masorde: सफर गोव्याची! रानवनांनी - नद्यांनी वेढलेले, औषधी पाण्याचा प्रवाह असणारे 'मासोर्डे'

World Introvert Day 2026: अंतर्मुखी लोक हे प्राचीन ग्रीक देवता 'अपोलो'सारखे असतात, जे ‘समजूतदारपणा’ हा गुण प्रकाशित करत असतात..

पुण्याच्या मैदानात 'रॉयल' एन्ट्री! IPL 2026 साठी गहुंजे स्टेडियम सज्ज; 'या' संघाचे सर्व होम मॅचेस पुण्यात रंगणार

Viral Video: सचिन तेंडुलकरची लेक 'सारा'च्या हातात बिअरची बाटली? गोव्यातील रस्त्यावरुन फिरतानाचा व्हिडिओ व्हायरल, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Goa Politics: ‘क्रॉस व्होटिंग’मध्ये कॉंग्रेसचाच हात! आमदार सिल्वा यांचा आरोप; विजय मिळाला नसला तरी लढत दिल्याचा दावा

SCROLL FOR NEXT