हाडं, अंडी, मेणबत्ती लावून शाळेच्या मैदानात ब्लॅक मॅजिक? हळदोणात रात्री बारा वाजता तरुणीला घेतलं ताब्यात

Goa News:चार ते पाच मेणबत्ती तेवत ठेऊन ती वर्तुळाच्या मध्ये बसली होती. स्थानिकांनी येऊन तरुणीला ती करत असलेल्या प्रकाराबाबत विचारणा केली.
Goa police occult activity case |
Black magic in Goa
Published on
Updated on

हळदोणा येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शाळेच्या आवारात एक तरुणी विचित्र पद्धतीने तांत्रिक गोष्टी करत असल्याचे स्थानिकांना आढळून आले. तरुणी रात्री बाराच्या सुमारास सेंट थॉमस मुलींच्या शाळेच्या आवारात एकटीच तांत्रिक गोष्टी करत असल्याचे दिसून आले. याप्रकरणी पोलिसांनी तरुणीला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता तिने ध्यानधारणा करत असल्याचे सांगितले.

या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. हळदोणा येथील सेंट थॉमस मुलींच्या शाळेच्या मैदानात एक तरुणी रात्रीच्या अंधारात बसलेली दिसली.

धक्कादायक बाब म्हणजे तरुणी ज्या वर्तुळात बसली होती त्या वर्तुळाच्या कडेला मानवी हाडे, दात, अंडी, खाऊची पाने, आणि मेणबत्ती लावण्यात आल्या होत्या. चार ते पाच मेणबत्ती तेवत ठेऊन ती वर्तुळाच्या मध्ये बसली होती. स्थानिकांनी येऊन तरुणीला ती करत असलेल्या प्रकाराबाबत विचारणा केली.

Goa police occult activity case |
Colvale Jail: गुन्‍हेगाराला ‘माणूस’ बनवणार! कोलवाळ येथे होणार अर्धमुक्त कारागृह; आराखडा बनविणे सुरू

स्थानिकांनी तरुणीला काळी जादू (ब्लॅक मॅजिक) करतेय का? असा सवाल केला असता तिने नकार देत ती ध्यान धारणा करत असल्याचे सांगितले.

पण, तिने सोबत आणलेली मानवी हाडं, दात, अंडी, खाऊची पाने आणि मेणबत्ती कोठून आणि कशासाठी आणली असे विचारले पण, त्यावर तिने काहीच उत्तर दिले नाही. यावेळी तरुणीने स्थानिकांवर हल्ला देखील करण्याचा प्रयत्न केला. शिवाय पोलिसांना बोलवून तक्रार करेन असा दमही दिला.

Goa police occult activity case |
Goa Agriculture Ambassador: स्वयंपूर्णतेचा संदेश देणारा वरद ‘कृषिदूत’! गोवा सरकारकडून ॲम्बेसिडर म्हणून निवड; भाजी उत्पादनात प्रगतीचा ध्यास

स्थानिकांनी अखेर पोलिसांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर तरुणीने सोबत आणलेले सर्व साहित्य बॅगेत भरण्यास सुरुवात केली व घटनास्थळावरुन पळ काढू लागली.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तरुणीला चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत तरुणीने कोणत्याही ब्लॅक मॅजिक कृत्याचा दावा खोडून काढला. तरुणी ध्यानधारणा करत असल्याचे तिने स्पष्ट केले. याबाबत अधिक तपास सुरु आहे.

स्थानिकांनी याप्रकरणी स्थानिक आमदाराने लक्ष घालण्याची विनंती केली आहे. तरुणी परराज्यातील असून, ती शाळेच्या मैदानात काळी जादूच करत होती असा आरोप स्थानिकांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com