Fight over Dog again in Noida, woman beats up man video goes viral. X, @NCMIndiaa.
देश

Viral Video: "कुत्ते की रखवाली, इंसानियत की तबाही..." नोएडामध्ये पुन्हा कुत्र्यावरुन भांडण, महिलेकडून एकाला मारहाण

Noida Video: व्हायरल व्हिडीओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, वाह रे दुनिया वाह रे ज़माना... कुत्ते की रखवाली, इंसानियत की तबाही...', तर दुसऱ्या यूजरने 'प्राण्यांसाठी लढताना ते स्वतःच प्राण्यांपेक्षाही वाईट झाले आहेत' अशी कमेंट केली आहे.

Ashutosh Masgaunde

Fight over Dog again in Noida, woman beats up man video goes viral:

आजकाल प्रत्येकजण सोशल मीडियावर सक्रिय असतो, त्यामुळे जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात एखादी गोष्ट घडली की ती व्हायरल व्हायला वेळ लागत नाही.

दरम्यान, सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला आपल्या कुत्र्यासोबत रहिवासी सोसायटीत फिरताना दिसत आहे.

दरम्यान, एका व्यक्तीने महिलेला कुत्र्याचे तोंड झाकण्यास सांगितले. या साध्या गोष्टीवर महिलेला राग आला आणि तिने त्या पुरुषाशी वाद घालण्यास सुरुवात केली. दोघांमधील वाद इतका वाढला की त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. महिलेने त्या व्यक्तीला बेदम मारहाण केली.

या व्हिडिओवर संताप व्यक्त करत एका ट्विटर यूजरने लिहिले, वाह रे दुनिया वाह रे ज़माना... कुत्ते की रखवाली, इंसानियत की तबाही...

हा व्हायरल व्हिडिओ ग्रेटर नोएडा येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. ही संपूर्ण घटना ग्रेटर नोएडा येथील सुपरटेक इको व्हिलेज-१ येथील रहिवासी सोसायटीत घडली.

लोक या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. व्हिडिओच्या शेवटी, भांडणाच्या शेवटी महिलेचा पतीही आला आणि पीडित व्यक्तीला पोलिसांची धमकी देत असल्याचे दिसत आहे.

या हाणामारी दरम्यान घटनास्थळी अनेक लोक जमा झाले. यातील एकाने या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला.

हा व्हिडिओ पोस्ट होताच वणव्यासारखा व्हायरल झाला. पीडित व्यक्तीसह सोसायटीमधील इतर सदस्यांनी महिलेविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली.

आता व्हिडिओवर लोकांकडून वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स येत आहेत. काही ठिकाणी लोक महिलेला चुकीचे म्हणत आहेत तर काही ठिकाणी लोक या संपूर्ण व्हिडीओची खिल्ली उडवताना दिसत आहेत.

व्हायरल व्हिडीओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, वाह रे दुनिया वाह रे ज़माना... कुत्ते की रखवाली, इंसानियत की तबाही...', तर दुसऱ्या यूजरने 'प्राण्यांसाठी लढताना ते स्वतःच प्राण्यांपेक्षाही वाईट झाले आहेत' अशी कमेंट केली आहे.

दुसर्‍या यूजरने लिहिले, 'मी ही अशी लढाऊ बायको आणीन, जी माझी प्रॉक्सी बनेल आणि इतर पुरुषांशी भांडेल.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

Porvorim Development: पर्वरीचा विकास वेगाने; परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम! फ्लायओव्हरपासून शेती, आरोग्य आणि क्रीडा सुविधांपर्यंत बदलांचा वेध

SCROLL FOR NEXT