Fauja Singh road accident Dainik Gomantak
देश

Fauja Singh: जगातील सर्वात वयस्कर, 114 वर्षांचे मॅरेथॉनपटू फौजा सिंह यांचे अपघाती निधन! जालंधर-पठाणकोट हायवेवर कारने दिली धडक

Fauja Singh Accident Death: जगातील सर्वात वयस्कर धावपटू फौजा सिंह यांचे सोमवारी जालंधर येथील रस्ते अपघातात निधन झाले. ते ११४ वर्षांचे होते. खुशवंत सिंह यांच्याकडून निधनाची माहिती देण्यात आली.

Sameer Panditrao

चंदीगड : जगातील सर्वात वयस्कर धावपटू फौजा सिंह यांचे सोमवारी जालंधर येथील रस्ते अपघातात निधन झाले. ते ११४ वर्षांचे होते. खुशवंत सिंह यांच्याकडून फौजा सिंह यांच्या निधनाची माहिती देण्यात आली. फौजा सिंह यांचे जालंधर-पठाणकोट हायवेवर कारने धडक दिल्यामुळे निधन झाले. कारने धडक दिल्यानंतर फौजा यांच्या मेंदूला गंभीर इजा झाली. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, पण संध्याकाळी त्यांचा मृत्यू झाला.

फौजा सिंह यांचा जन्म १ एप्रिल १९११ मध्ये जालंधर येथील ब्यास पिंड या गावामध्ये झाला. वयाच्या पाचव्या वर्षांपर्यंत त्यांना नीट चालताही येत नव्हते. १९९०च्या दशकात सुरुवातीला त्यांनी पत्नी व मुलालाही गमावले. या निराशेमधून बाहेर येण्यासाठी त्यांनी धावायला सुरुवात केली. यानंतर त्यांनी मागे वळून बघितले नाही. त्यांना ‘टरबन टोरनॅडो’ (पगडीधारी वादळ) या नावाने ओळखले जात होते.

फौजा सिंह यांनी ८९व्या वर्षी पहिल्यांदाच स्पर्धात्मक शर्यतीत सहभाग घेतला. २००० मध्ये लंडन येथे त्यांनी पहिली मॅरेथॉन शर्यत पूर्ण केली. फौजा सिंह यांनी लंडन, टोरंटो, न्यूयॉर्क, मुंबई या शहरांमध्ये नऊ मॅरेथॉन शर्यती पूर्ण केल्या. २००३ मध्ये टोरंटो येथे झालेली मॅरेथॉन शर्यत त्यांनी पाच तास, ४० मिनिटे व चार सेकंदात पूर्ण केली.

९० वर्षांवरील वयोगटात त्यांनी उल्लेखनीय प्रदर्शन केले हे विशेष. २०११ मध्ये त्यांनी टोरंटो येथील मॅरेथॉन पूर्ण करताना विक्रमावर मोहर उमटवली. १००व्या वर्षी मॅरेथॉन पूर्ण करणारे ते जगातील पहिलेच व्यक्ती ठरले. ही मॅरेथॉन त्यांनी आठ तासांमध्ये पूर्ण केली. फौजा सिंह यांनी लंडन ऑलिंपिकमध्ये मशाल हातामध्ये घेऊन धावण्याचा मानही मिळवला होता. त्यांनी २०१३ मध्ये हाँगकाँग व चीन येथील शर्यतीत सहभाग घेतला. त्यानंतर स्पर्धात्मक शर्यतीमधून त्यांनी निवृत्त होण्याचा निर्णय घेतला.

फौजा सिंह यांच्या जीवनावर आधारित ‘टरबन टोरनॅडो’ (पगडीधारी वादळ) हे पुस्तक २०११ मध्ये प्रकाशित करण्यात आले होते. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फौजा सिंह यांच्या निधनानंतर सोशल माध्यमावर शोक व्यक्त केला. ते म्हणाले की, ‘‘फौजा सिंह हे अद्वितीय व्यक्तिमत्त्वामुळे आणि भारतातील तरुणांना फिटनेस (तंदुरुस्ती) या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर प्रेरणा देण्याच्या पद्धतीमुळे असाधारण होते.’’

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Paper Leak Issue: विद्यापीठातील प्रश्‍नपत्रिकांची चोरी उघड; चौकशी समितीचा भौतिकशास्त्राचे प्राध्यापक, डीन, रजिस्ट्रार, कुलगुरूंवर ठपका

Rashi Bhavishya 17 July 2025: प्रवासाचे योग, प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील; मान-सन्मान वाढेल

Delhi Goa Flight: विमानात तांत्रिक बिघाड; दिल्लीतून गोव्याला येत असलेले विमान मुंबईला वळवले

पावसाळी अधिवेशनापूर्वी आमदार विजय सरदेसाई अडचणीत; सभापती तवडकरांबाबत जातीय वक्तव्य केल्याप्रकरणी पोलिस तक्रार

Israel Syria Attack: दमास्कसमधील 'ड्रोन हल्ला' लाइव्ह! स्फोट होताच टीव्ही अँकरची उडाली भंबेरी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT