Rahul Gandhi
Rahul Gandhi Dainik Gomantak
देश

राहुल गांधी यांनी पुन्हा केंद्र सरकारवर डागली तोफ

दैनिक गोमन्तक

राहुल गांधी(Rahul Gandhi) यांनी दिल्ली(Delhi) सीमेवरती चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या(Farmer Protest) समर्थनात एक ट्वीट करत सरकारवर टीका केली आहे. ‘सरळ सरळ आहे. आम्ही सत्याग्रही अन्नदात्यासोबत आहोत ’, असं ट्वीट राहुल गांधी यांनी केलं आहे. त्यासोबत FarmersProtest असा हॅशटॅगही दिला आहे.

काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी सतत केंद्र सरकारच्या(Central Goverment) विविध धोरणांवर टीका करत असतात. कुठल्याही प्रसंगी केंद्र सरकारला धारेवर धरण्याची संधी सोडत नाहीत त्यातच मागील काही दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं जे आंदोलन चालू आहे त्यामुळे सतत राहुल गांधी त्यांच्या समर्थनात उतरत सरकारवर आरोपांच्या तोफा डागताना दिसत आहेत.

त्यातच आता राहुल गांधींच्या एका ट्विटने सरकारवर टीकास्त्र डागल आहे कृषी कायद्यांवरून सरकारला खडे बोल सुनावत आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांसोबत असल्याचं त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे . शेतकरी आंदोलनाला सात महिने पूर्ण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. केंद्राने पारीत केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात २६ नोव्हेंबरपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. यासाठी दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी ठाण मांडलं आहे. तीन कृषी कायदे रद्द करण्यासोबतच धान्याला किमान आधारभूत किंमत मिळावी यासाठी शेतकरी आग्रही आहेत. यावरून गेल्या काही महिन्यात दिल्लीतलं राजकारण चांगलंच ढवळून निघत आहे .

शेतकरी आंदोलनावर केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट करत सरकार चर्चेसाठी तयार असल्याच वारंवार सांगितलं आहे. मात्र कृषी कायदे रद्द करण्यास नकार दिला आहे. सरकार आणि अंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनेच्या नेत्यांमध्ये अनेकवेळा चर्चा झाल्या खरी मात्र त्यातून कोणताही मार्ग निघाला नाही. आता अशातच पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मानले गोमन्तकीयांचे आभार

Lok Sabha Election 2024: मतदान करतानाचा फोटो काढताना फातोर्डा येथे महिलेला पकडले; चौकशीअंती सुटका

Pulitzer Prize 2024: पुलित्झर पुरस्कार 2024 जाहीर! शोध पत्रकारितेसाठी द न्यूयॉर्क टाइम्सच्या हॅना ड्रेयर यांचा सन्मान; वाचा संपूर्ण यादी

Lok Sabha Election 2024: बार्देशात ‘सायलंट वोटिंग’चा करिष्मा! कळंगुटमध्ये अल्पसंख्याकांचे मतदान वाढले

रेजिनाल्ड, रुबर्ट यांच्या नावे सोशल मीडियावर खोटी पत्रके व्हायरल झाल्याने गोंधळ

SCROLL FOR NEXT