Crime News Dainik Gomantak
देश

बलात्काराचे खोटे गुन्हे दाखल करण्याचा बनतोय 'ट्रेंड'; तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी...

Fake Rape Cases: ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता’ म्हणजे जिथे स्त्रियांचा आदर होतो, तिथे भगवंताचा वास असतो.

Manish Jadhav

Fake Rape Cases: ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता’ म्हणजे जिथे स्त्रियांचा आदर होतो, तिथे भगवंताचा वास असतो. या परंपरेचे पालन करुन भारतात महिलांना समान अधिकार दिले जातात.

पण, आज महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये भारताचा क्रमांक अव्वल देशांमध्ये आहे, हे आश्चर्यकारक आहे. महिला सुरक्षित राहण्यासाठी प्राधान्य दिले जाते, त्यासाठी कायदेही केले जातात. पण महिलांनी त्याचा गैरवापर केला तर?

दरम्यान, विष्णू तिवारी या 23 वर्षीय तरुणाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याच्यावर बलात्काराचा आरोप होता. मात्र 20 वर्षांनंतर विष्णूवर बलात्काराचे खोटे आरोप करण्यात आल्याचे लक्षात घेऊन न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली.

हिमाचलमधील रहिवासी योगेश कुमारवर एका महिलेने बलात्काराचे खोटे आरोप केले होते. त्यानंतर योगेशने विष प्राशन करुन आत्महत्या केली होती. महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या मनीषने फेसबुक लाईव्ह करुन आत्महत्या केली होती.

पोलिसांनी (Police) सांगितले की, मनीषच्या 19 वर्षीय प्रेयसीने तिच्या कुटुंबासह त्याच्यावर बलात्काराच्या खोट्या आरोपात अडकवण्याचा प्रयत्न केला.

महिलेवर बलात्काराचा आरोप होऊ शकतो का?

दरम्यान, अशी अनेक प्रकरणे दररोज समोर येतात ज्यात अनेक अल्पवयीन मुले बलात्काराच्या खोट्या आरोपामुळे अडकतात. शेवटी, न्यायासाठी लढण्याऐवजी ते आत्महत्या करण्याचा निर्णय घेतात. सर्वोच्च न्यायालयानेच (Supreme Court), बलात्काराच्या खोट्या आरोपांवर भाष्य करताना म्हटले आहे की, हे आरोपींना समान प्रमाणात त्रास, अपमान आणि हानी पोहोचवण्याचे साधन बनत आहे.

नुकतंच सर्वोच्च न्यायालयात एक केस समोर आली होती, ज्यात एका 61 वर्षीय महिलेने आपल्या सुनेवर बलात्काराचा आरोप केला होता. परंतु, भारतीय कायद्यात असे कोणतेही कलम नाही जे बलात्काराशी संबंधित गुन्ह्यात महिलेवर कारवाई करु शकेल.

आयपीसीच्या कलम 375 (बलात्कार) मध्ये फक्त महिलांसाठी लिहिलेल्या तरतुदी आहेत. त्याचबरोबर, एखाद्या मुलाने दुसऱ्या मुलावर बलात्कार केल्यास कलम 377 (अनैसर्गिक सेक्स) अंतर्गत एफआयआर दाखल केला जाऊ शकतो.

पण जर एखाद्या मुलीने बलात्कार केला तर तिच्यासाठी कायदा नाही. मात्र, महिलेवर बलात्काराचा आरोप होऊ शकतो का, यावर सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच प्रश्न उपस्थित केले आहेत.

'न्यायालय म्हणाले, 'हा एक ट्रेंड झाला आहे'

अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान टिप्पणी केली होती की, महिलांकडून POCSO/SC-ST प्रकरणांतर्गत बलात्काराचे खोटे गुन्हे दाखल करण्याचा ट्रेंड बनला आहे. त्या याचा वापर ‘पैसे लुटण्याचे साधन’ म्हणून करतात.

दुसरीकडे, टिंडर-बंबल सारख्या सोशल मीडिया अॅप्सनेही बनावट बलात्काराच्या घटनांना जन्म दिला आहे. मुली प्रथम या प्लॅटफॉर्मवरुन मुलांना फूस लावतात, नंतर बलात्काराच्या खोट्या धमक्या देऊन त्यांच्या संपूर्ण टोळीसह त्यांना अडकवतात.

अशा प्रकरणातील सर्वात लोकप्रिय प्रकरण म्हणजे जयपूरचे टिंडर मर्डर प्रकरण. ज्यामध्ये प्रिया आधी दुष्यंत नावाच्या मुलाला आपल्या जाळ्यात अडकवते, नंतर त्याचे अपहरण करते आणि खंडणीची मागणी करते. नंतर ती दुष्यंतलाही मारते.

दुसरीकडे, बलात्कार, छळ आणि क्रूरता यासारख्या गुन्ह्यांचा सामना करणार्‍या महिलांचे आयुष्य यामुळे नक्कीच उद्ध्वस्त झाले. 2012 मध्ये झालेल्या निर्भया बलात्कार प्रकरणानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर घाईघाईने कायदेही बनवले गेले.

महिला आणि मुलींवरील बलात्काराच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्याचा उद्देश होता. पण कदाचित ते इतके बळकट झाले आहे की, आता उलट कायद्याच्या या भूमिकेचा गैरवापर सुरु झाला आहे. कदाचित त्यामुळेच एनसीआरबीच्या आकडेवारीत बनावट बलात्काराची प्रकरणे वाढत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

स्थानिक टॅक्सी युनियनची दादागिरी; बीच भागात येणाऱ्या टॅक्सी चालकांवर हल्ला, गाडीची तोडफोड, असोसिएशनकडून तक्रार

Goa Today's Live News: सांगेत बिरसा मुंडा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद!

गोकुळची ‘ती’ फुगडी स्पर्धा ठरली अखेरची! एकुलता एक मुलगा, अर्धांगवायू झालेला पती; कमावत्या महिलेचा Heart Attack ने मृत्यू

Goa Medical College: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या; ही संधी गमावू नका!! 'गोमेकॉ' ने केलीये फिजिओथेरपीच्या जागांमध्ये लक्षणीय वाढ

Sao Jose De Areal Gramsabha: औद्योगिक कचऱ्याच्या प्रदूषणामुळे कारखान्यांवर कडक कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT