Expulsion of Indian Army Major in Espionage case, direct action taken by the President Draupadi Murmu. Dainik Gomantak
देश

Indian Army: हेरगिरी प्रकरणी लष्कराच्या मेजरची हाकालपट्टी, थेट राष्ट्रपतींनी केली कारवाई

Spying: चौकशीमध्ये हे उघड झाले की, मेजरचे सोशल मीडियावर एका ऑपरेटिव्हशी संबंध होते जो पाकिस्तानी गुप्तचर संस्थेसाठी काम करत होता.

Ashutosh Masgaunde

Expulsion of Indian Army Major in Espionage case, direct action taken by the President Draupadi Murmu:

राष्ट्रीय सुरक्षेचा भंग केल्याप्रकरणी लष्कराचा एक मेजर दोषी आढळला आहे. यानंतर मेजरवर थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कारवाई करत सेवेतून बडतर्फ केले आहे.

असे सांगण्यात येत आहे की, मेजर स्ट्रॅटेजिक फोर्स कमांड (SFC) मध्ये तैनात होता. संवेदनशील माहिती उघड करण्यामध्ये मेजरचा सहभाग असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांच्या समोर आले होते. त्यानंतर लष्कराने मार्च 2022 मध्ये मेजरच्या या कृत्यांची चौकशी सुरू केली होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रपती, जे तिन्ही सैन्यांचे सर्वोच्च कमांडर देखील आहेत, त्यांनी लष्कर कायदा, 1950 अंतर्गत अधिकारांचा वापर करताना मेजरच्या सेवा समाप्त करण्याच्या आदेशावर गेल्या आठवड्यात स्वाक्षरी केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, मेजरच्या सेवा समाप्तीची ऑर्डर सप्टेंबरच्या मध्यात जारी करण्यात आली होती आणि राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर यावर शिक्केमोर्तब करण्यात आले.

मेजरच्या बडतर्फीबाबत कोणतेही अधिकृत भाष्य करण्यात आलेले नाही. सूत्रांनी सांगितले की, आरोप समोर आल्यानंतर नियुक्त करण्यात आलेल्या 'बोर्ड ऑफ ऑफिसर्स'च्या निष्कर्षांवर आधारित मेजरची सेवा समाप्ती केली आहे. मेजरवरील आरोप समोर आल्यानंतर त्याला गेल्या वर्षी निलंबित करण्यात आले होते.

सूत्रांनी सांगितले की, हे प्रकरण घडले त्यावेळी मेजर उत्तर भारतातील एका ठिकाणी एसएफसी युनिटमध्ये तैनात होता. हे उघड झाले की, मेजरचे सोशल मीडियावर एका ऑपरेटिव्हशी संबंध होते जो पाकिस्तानी गुप्तचर संस्थेसाठी काम करत होता.

सूत्रांनी सांगितले की, मेजरवर देशातील प्रमुख व्यक्तींबाबतची गुप्त माहिती बाळगणे आणि ती अनधिकृत व्यक्तींना पुरवणे यासह हेरगिरीमध्ये संभाव्य सहभागाचे आरोप आहेत.

ते म्हणाले की, मेजरच्या फोनमध्ये गोपणीय माहिती आढळून आली आहे, जी निर्धारित सुरक्षा प्रोटोकॉलचे उल्लंघन आहे.

राष्ट्रीय सुरक्षा प्रोटोकॉलच्या संभाव्य उल्लंघनासाठी ब्रिगेडियर दर्जाच्या अधिकाऱ्यासह सुमारे दीड डझन संरक्षण कर्मचाऱ्यांची स्वतंत्रपणे चौकशी करण्यात येत असल्याची माहिती आहे.

हा मेजर 'पटियाला पेग' नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपचा भाग असल्याचे आढळून आले. लष्कराच्या सोशल मीडिया धोरणांचे कथित उल्लंघन केल्याप्रकरणी ब्रिगेडियरसह किमान काही अधिका-यांवर पुढील काही आठवड्यांत शिस्तभंगाची कारवाई सुरू होण्याची अपेक्षा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT