पश्चिम बंगालमधील हस्तकला कारागिरांचे कला प्रदर्शन

 

Dainik Gomantak

देश

पश्चिम बंगालमधील हस्तकला कारागिरांचे कला प्रदर्शन

पश्चिम बंगालमधल्या (West Bangal) हस्त कलाकारांचे हे प्रदर्शन आज पासून सुरू होत असून ते 30 डिसेंबरपर्यंत चालेल.

दैनिक गोमन्तक

मेरशी इथल्या ‘साधना देल आर्ट’ मधल्या उपक्रमांची वर्षसमाप्ती पश्चिम बंगालमधल्या ग्रामीण पारंपरिक हस्तकला प्रदर्शनाने होत आहे. या प्रदर्शनात प्रणब कुमार डे यांचे ‘सीतालपती’, संताना बीबी यांचे ‘कांथा’, हरिपदा दास अधिकारी यांचे ‘मडूर’ आणि रहीम चित्रकार यांचे ‘पतचित्र’ अशा विविध हस्तकलांचे प्रात्यक्षिक आणि कलेसंबंधात त्यांच्याबरोबर संवाद होईल.

‘सीतालपती’ हे चटयांवरील पारंपारिक विणकाम आहे, पण त्याव्यतिरिक्त या कलेत वाकबगार असलेले प्रणब कुमार डे हे या कलेद्वारे बॅग, बॉक्स वगैरे आकर्षक वस्तूदेखील तयार करतात.‘कांथा’ हे विविध पेहरावांवर केले जाणारे नक्षीदार विणकाम आहे. साडी (saree) , दुपट्टा, बॅगा वगैरे वस्तूंवर हे विणकाम करून त्या वस्तू आकर्षक बनवल्या जातात. संताना बीबी यांनी यापूर्वी आपल्या या कलेचे प्रदर्शन देशभरात केले आहे.

टेबल मॅट, वॉल हैंगिंग, पडदे वगैरे आकर्षकरित्या विणण्याच्या ‘मडूर’ कलेत हरिपदा दास यांनी कौशल्य मिळवले आहे. त्यांच्या या हस्तकलेचे प्रदर्शन देशभरात होत असते. रहीम चित्रकार आपल्या वयाच्या आठव्या वर्षापासून ‘पतचित्र’ या पारंपरिक शैलीतून चित्रे रंगवत आहेत. राज्य पुरस्काराने सन्मानित या कलाकाराने देशाच्या महत्त्वाच्या शहरांमधून आपली चित्रे सादर केली आहेत.पश्चिम बंगालमधल्या (West Bangal) हस्त कलाकारांचे हे प्रदर्शन आज पासून सुरू होत असून ते 30 डिसेंबरपर्यंत चालेल. हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

नोंदणी न केलेले होम स्टे, हॉटेल्सवर कारवाई अटळ! सरकारी महसूल बुडविणाऱ्यांची गय नाहीच, पर्यटनमंत्र्यांचा थेट इशारा

Horoscope 28 Saptember 2026: करिअरला मिळणार गती, वैवाहिक जीवनात गोडवा वाढणार! आज 'या' राशींच्या नक्षत्रात चमकणार यशाचा तारा

History: सदाशिवगड ताम्रपट अन् गोव्यातील कदंब

South Africa Bar Shooting: बारमध्ये एन्जॉय करत होते लोक, अचानक अंदाधुंद गोळीबार; 17 जणांचा मृत्यू, 15 जखमी VIDEO

कुणबी साडीवर दावा कुणाचा?

SCROLL FOR NEXT