PM Narendra Modi & PM Pushpa Kamal Dahal Prachanda Dainik Gomantak
देश

Nepal PM India Visit: भारत नेपाळला देणार 10,000 मेगावॅट वीज... PM मोदींची मोठी घोषणा!

Nepal PM India Visit: नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड सध्या भारत दौऱ्यावर आहेत. प्रचंड यांनी गुरुवारी दिल्लीतील हैदराबाद हाऊसमध्ये पंतप्रधान मोदींची भेट घेतली.

Manish Jadhav

Nepal PM India Visit: नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड सध्या भारत दौऱ्यावर आहेत. प्रचंड यांनी गुरुवारी दिल्लीतील हैदराबाद हाऊसमध्ये पंतप्रधान मोदींची भेट घेतली. यादरम्यान दोघांमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली.

त्यानंतर दोन्ही पंतप्रधानांसोबत शिष्टमंडळ पातळीवरील बैठक झाली. यादरम्यान दोन्ही देशांमधील अर्थव्यवस्था, ऊर्जा, पायाभूत सुविधा, शिक्षण क्षेत्र आणि पीपल टू पीपल संबंध मजबूत करण्यावर चर्चा झाली.

दरम्यान, पीएम मोदी आणि त्यांचे समकक्ष प्रचंड यांनी संयुक्तपणे भारत आणि नेपाळ दरम्यान मोतिहारी-अमलेखगंज तेल पाइपलाइनच्या फेज-2 ची पायाभरणी केली. तसेच, रेल्वेच्या कुर्था-बिजलपुरा विभागाच्या ई-योजनेचेही अनावरण करण्यात आले.

दोन्ही पंतप्रधानांनी यावेळी बथनाहा ते नेपाळ कस्टम यार्डपर्यंत भारतीय रेल्वेच्या मालवाहू ट्रेनला संयुक्तपणे हिरवा झेंडा दाखवला. पीएम प्रचंड यांनी पीएम मोदींना नेपाळ (Nepal) भेटीचे निमंत्रण दिले आहे.

मी नेपाळला हिट फॉर्म्युला दिला

पीएम मोदी म्हणाले की, ''मला आठवते, 9 वर्षांपूर्वी 2014 मध्ये, पदभार स्वीकारल्यानंतर तीन महिन्यांत मी नेपाळचा पहिला दौरा केला होता.

त्यावेळी, मी भारत-नेपाळ संबंधांसाठी 'हिट' फॉर्म्युला दिला होता - हाय-वे, आय-वे आणि ट्रान्स-वे. त्यावेळी, मी म्हणालो होतो की आम्ही भारत (India) आणि नेपाळमध्ये असे संपर्क प्रस्थापित करु की आमच्या सीमा आमच्यामध्ये अडथळा बनणार नाहीत.''

10 वर्षात 10 हजार मेगावॅट वीज आयात करणार

पंतप्रधान पुढे म्हणाले की, ''नवीन रेल्वे मार्गांसह नेपाळमधील लोकांसाठी भारताच्या अंतर्देशीय जलमार्गांच्या सुविधेसाठीही तरतूद करण्यात आली आहे.

आज पंतप्रधान प्रचंड जी आणि मी आमची पार्टनरशिप भविष्यात सुपरहिट होण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. आज ट्रांजिट अग्रीमेंट संपन्न झाले.

त्याचबरोबर, भारत आणि नेपाळ दरम्यान 'दीर्घकालीन ऊर्जा व्यापार करार' संपन्न झाला आहे. यामध्ये नेपाळमधून येत्या 10 वर्षांत 10,000 मेगावॅट वीज आयात करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.''

रामायण सर्किट प्रकल्पाला गती मिळेल

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, ''भारत आणि नेपाळमधील धार्मिक आणि सांस्कृतिक संबंध खूप जुने आणि मजबूत आहेत. हा सुंदर दुवा आणखी मजबूत करण्यासाठी, पंतप्रधान प्रचंड जी आणि मी ठरवले आहे की, रामायण सर्किटशी संबंधित प्रकल्पांना गती दिली पाहिजे.

दोन्ही देशांतील संबंध अधिक दृढ करण्यासाठी आम्ही कार्यरत राहू... आणि याच भावनेने, आम्ही सर्व प्रश्न सोडवू, मग तो सीमाप्रश्न असो किंवा इतर कोणताही मुद्दा.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT