पुष्प कमल दहल प्रचंड आज पुन्हा एकदा नेपाळच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.स्थानिक वेळेनुसार, दुपारी 4 वाजता पंतप्रधानपदाची शपथ घेतील. पुष्प कमल दहल प्रचंड आज तिसऱ्यांदा नेपाळचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतील. नेपाळच्या राष्ट्रपती कार्यालयाने ट्विट करून ही माहिती दिली. माओवादी नेते पुष्प कमल दहल प्रचंड हे नेपाळचे पुढील पंतप्रधान असतील. राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांनी देशाचे नवे पंतप्रधान म्हणून प्रचंड यांची नियुक्ती केली आहे.
नेपाळमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर कोणत्याही राजकीय पक्षाला बहुमत मिळाले नाही. त्यानंतर नाट्यमय घडामोडी झाल्या. विरोधी सीपीएन-यूएमएल पक्ष (CPN-UML) आणि इतर लहान पक्षांनी प्रचंड यांना पाठिंबा देण्याचे मान्य केले. यामुळे प्रचंड यांच्या नावावर पंतप्रधान पदासाठी रविवारी शिक्कामोर्तब झाला. त्यानंतर आज त्यांचा शपथविधी पार पडणार आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.