Qutub Minar  Dainik Gomantak
देश

कुतुबमिनार संकुलात होणार उत्खनन, आयकॉनोग्राफी करण्याच्या सूचना

राष्ट्रीय राजधानी दिल्लीत (Delhi) असलेल्या कुतुबमिनार संकुलात उत्खनन सुरु होऊ शकते.

दैनिक गोमन्तक

राष्ट्रीय राजधानी दिल्लीत असलेल्या कुतुबमिनार संकुलात उत्खनन सुरु होऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने कुतुबमिनारमध्ये मूर्तींचे Iconography तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. कुतुबमिनार संकुलातील अहवालाच्या आधारे उत्खनन सुरु होणार आहे. ASI उत्खननासाठी सांस्कृतिक मंत्रालयाला अहवाल देईल. सांस्कृतिक सचिवांनी शनिवारी अधिकाऱ्यांसमवेत केलेल्या भेटीत हे निर्णय घेतले आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मिनाराच्या दक्षिणेला असलेल्या मशिदीपासून 15 मीटर अंतरावर उत्खनन सुरु केले जाऊ शकते.

आयकॉनोग्राफी म्हणजे काय?

आयकॉनोग्राफी ही कला इतिहासाची एक शाखा आहे. Iconography मूर्तींच्या सामग्रीची ओळख, वर्णन आणि व्याख्या यांचा अभ्यास करते. काही दिवसांपूर्वी साकेत कोर्टात कुतुबमिनार संकुलात असलेल्या कुवुतुल इस्लाम मशिदीमध्ये (Mosque) हिंदू देवतांचा जीर्णोद्धार आणि पूजा करण्याचा अधिकार मिळावा यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. ज्यावर आज 24 मे रोजी साकेत न्यायालयात (Court) सुनावणी होणार आहे.

दुसरीकडे, याचिकेत दावा करण्यात आला आहे की, मुहम्मद घोरीचा सेनापती कुतुबुद्दीन ऐबकने (Qutbuddin Aibak) 27 मंदिरे पाडली होती. त्यानंतर या परिसरात कुव्वत-उल-इस्लाम मशीद बांधली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT