Train Viral Video: सोशल मीडियावर दररोज हजारो अतरंगी व्हिडिओ व्हायरल होतात, ज्यामध्ये कधी स्टंट करतानाचे तर कधी रेल्वेतील हटके अंदाजातील व्हिडिओ असतात. सध्या असाच एक रेल्वेतील अतरंगी व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू आवरणार नाही. प्रवाशाने असा काही जुगाड लावला आहे, जो पाहून तुम्हीही अवाक व्हाल.
सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ एका ट्रेनच्या आतमध्ये शूट करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये दिसते की, एक तरुण आपला मोबाईल फोन चार्जिंगला लावतो. त्यानंतर, तो फोन सुरक्षित ठेवण्यासाठी जे करतो, त्यासाठी त्याने भन्नाट 'डोके' वापरले आहे. हा तरुण सीटवर झोपतो आणि आपला फोन कोणालाही दिसू नये म्हणून थेट आपल्या पॅन्टच्या आतमध्ये ठेवतो. फोन आत ठेवल्यानंतर तो आपल्या शर्टाची उघडी असलेली बटणे व्यवस्थित बंद करतो आणि आरामात झोपून जातो. साध्या खिशातील फोन चोर सहज काढू शकतात, पण पॅन्टच्या आतून फोन काढणे कोणत्याही चोराला शक्य नाही, त्यामुळे या तरुणाने फोन चोरीपासून वाचवण्यासाठी ही 'Z+ सिक्युरिटी' आयडिया वापरल्याचे दिसते.
जरी फोन चोरीपासून सुरक्षित राहिला असला तरी, जर चार्जिंगदरम्यान फोनचा स्फोट (Phone Blast) झाला, तर काय होईल याचा विचार या तरुणाने केला नाही, असे अनेकांचे म्हणणे आहे. त्याची ही अतरंगी कृती पाहूनच हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ 'एक्स' प्लॅटफॉर्मवर @sankii_memer नावाच्या अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये गंमत म्हणून 'Z+ Security' असे लिहिले आहे. ही बातमी लिहेपर्यंत हा व्हिडिओ 1800 हून अधिक लोकांनी पाहिला आहे.
व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या.
एका युजरने कमेंट केली की, "भावाला कशाचीच भीती नाही."
दुसऱ्या युजरने लिहिले: "मानले उस्ताद!"
तिसऱ्या युजरने लिहिले: "पूरी सिक्युरिटी आहे, भाऊ!"
चौथ्या युजरने सुरक्षेची चिंता व्यक्त करत लिहिले: "भाऊ, रेडिएशनमुळे कॅन्सर होऊ शकतो."
तर एका अन्य युजरने मजेशीर प्रतिक्रिया दिली की, "आता चोर काय करणार?"
या तरुणाने चोरीपासून फोन वाचवण्यासाठी वापरलेली ही अनोखी आणि काहीशी धोकादायक युक्ती सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.